लोकप्रतिनिधीवर बरसला तक्रारींचा पाऊस, वॉर्डातील नागरिकांनाच दमदाटी

सुराणा नगर वॉर्डातील शेकडो नागरिक देसरडाचे कारनामे करणार उघड!

0
औरंगाबाद : सुराणा नगर वॉर्डातील असंख्य लोकांना देसरडा यांनी दमबाजी केल्याच्या तक्रारी आता येत आहेत. कंत्राटदाराची पाठराखण करून बोगस विकास कामे करायची आणि विरोध करणार्‍या वॉर्डातील नागरिकांनाच दमदाटी करायची, असा प्रशांत देसरडा यांचा खाक्या ! कालही त्यांनी सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणार्‍यांना धमक्या दिल्या, शिवीगाळ केली.
 चिस्तिया चौक ते एमजीएम या सिमेंट रस्त्याच्या काम निकृष्ठ दर्जामुळे  नागरिकांनी हे काम बंद पाडले. त्यामुळे देसरडा यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या. त्यांनी फोनाफोनी करून नागरिकांना दमबाजी केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर एका पत्रकाराला शिवीगाळ करण्यापर्यंत देसरडा यांची मजल गेली. विशेष म्हणजे लोक रस्त्यावर उतरले असताना देसरडा ऑफिसमध्ये बसून कंत्राटदारासोबत वाटाघाटी करीत होता. या प्रकरणानंतर आता सुराणा नगर वॉर्डातील शेकडो नागरिक पुढे आले आहेत. देसरडाचे कारनामे आम्ही उघड करणार, असा दावा या नागरिकांनी केला. एकदा एका निवृत्त अभियंत्याच्या घरासमोरील काम बोगस होत असल्याने त्यांनी ते रोखले.  देसरडा यांना ही बाब समजताच त्यांनी ज्येष्ठ अभियंत्याला धमकी दिली. एका ज्येष्ठ नागरिकाला वयाचा विचार न करता देसरडा यांनी कशी शिवीगाळ केली याचे किस्सेही सुराणा नगरात ऐकायला मिळत आहेत.
या कामात गैरप्रकार होत असल्याने संतप्त नागरिकांनी कंत्राटदार चव्हाण यांनाच फोनवर जाब विचारला. काल जवळपास 50 हून अधिक फोन कंत्राटदाराला गेले. अखेर कंटाळलेल्या कंत्राटदाराने तुम्ही आनंद घोडेले यांच्याशी बोला असाच सल्ला तक्रारदारांना दिला.  दरम्यान वाय. एस. खेडकर रुग्णालयासून सुरू झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत आहे. तसेच ड्रेनेजच्या कामामध्ये विटा ऐवजी पेव्हर ब्लॉक वापरून चेंबरचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम पाडा, अशी मागणी आता नागरिक करीत आहेत. याबाबत स्थानिकांनी आमदार अतुल सावे यांच्याशी संपर्क साधून तक्रारी केल्या.  आ. सावे या कामाच्या पाहणीसाठी येणार असल्याचे समजते.  रस्त्याच्या बोगस बांधकामाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेले असताना या वॉर्डाच्या नगरसेविकेचे पती प्रशांत देसरडा तिकडे फिरकलेही नाहीत. नागरिकांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत तक्रारी केल्या. दुसरे नेते नागरिकांच्या समस्यांसाठी टाऊन सेंटर परिसरात दाखल होत असताना देसरडा मात्र तिकडे फिरकलेही नाहीत.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.