औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न अनेक वर्षांपासून जैसे थे

रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवण्याच्या अफवेने उडाली खळबळ

0
औरंगाबाद : रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेचा प्रश्न गेले अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.  सोमवारी रेल्वेस्थानकावर बॉम्बच्या अफवेने खळबळ उडाली. यासारख्या अफवेमुळे प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले. येथे सुरक्षा बघता,   पाहिले तर रेल्वेस्थानक परिसरात कोणीही सहज प्रवेश करू शकतो. सध्या रेल्वे बंद असल्याने चोर्‍या कमी झाल्या आहेत. मात्र तरी देखील रेल्वे स्थानक परिसर वार्‍यावरच आहे.
अनेक वर्षांपासून रेल्वेस्थानक परिसरातील प्रवेशद्वारासमोर मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत आहे. याशिवाय रेल्वे स्थानकाच्या काही परिसरातून सहज कोणीही येऊ अथवा जाऊ  शकतो. यामुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर औरंगाबाद ते मुकुंदवाडी, चिकलठाणा दरम्यान देखील असुरक्षितता आहे. रेल्वे चा स्पीड याठिकाणी कमी असतो. सध्या लॉकडाऊननंतर केवळ अमृतसर-नांदेड आणि नांदेड अमृतसर रेल्वे धावत आहे. या रेल्वे गेल्यानंतर रेल्वे स्थानकावर कोणीही नसते. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकावर आणखी सुरक्षा वाढविली पाहिजे. असे देखील प्रवाशांकडून बोलले जात आहे. राज्यातील अनेक रेल्वे स्थानकावर प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर आहेत. बॅग स्कॅनरदेखील बसविले आहेत.  रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशांकडे तिकीट आहे की नाही, याची देखील तपासणी केली जाते. परंतु औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसरात ना मेटल डिटेक्टर बसविले ना बॅग स्कॅनर. त्यामुळे प्रवाशांच्या बॅग ची तपासणी केली जात नाही. यामुळे देखील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. सोमवारी रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बच्या अफवेच्या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने रेल्वेस्थानक परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली. रेल्वे स्थानकावर एकूण 42 सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने सुरक्षेसाठी 24 तास लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच हॅन्ड मेटल डिटेक्टरद्वारे प्रवाशांची तपासणीदेखील केली जात असल्याचे आरपीएफ पोलिसांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.