राज्यपाल नियुक्त १२ जागांचा प्रस्ताव पुढे ढकलला

ऐनवेळी सरकारने.प्रस्ताव न आणण्याचा निर्णय

0

मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणण्याची आघाडी सरकारची तयारी होती. यासंदर्भात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काल बैठकही झाली होती. मात्र ऐनवेळी प्रस्ताव न आणण्याचा निर्णय सरकारने घेतला. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण हा प्रस्ताव तूर्तास पुढे ढकलण्यात आला.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण हा प्रस्ताव तूर्तास पुढे ढकलण्यात आला. राज्यपाल नियुक्त १२ नावांना मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन ती नावे मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का ? याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंतिम क्षणी खडसेंचे नाव येणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नाव देणार आहेत. काँग्रेसकडून रजनी पाटील, सत्यजित तांबे, नसीम खान, मुझफर हुसेन, सचिन सावंत आणि मोहन जोशी या नावांची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून श्रीराम शेटे,गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांच्या नावाची चर्चा आहे. यात राजू शेट्टी याचं नाव यापूर्वीच अंतिम झाले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.