‘छत्रपती शाहू अभियांत्रिकी’चे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदेंची लोणेरे कार्यकारी परिषदेवर फेरनिवड

विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी केली डॉ. उल्हास शिंदे यांची फेरनियुक्ती

0

औरंगाबाद  :  छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरेच्या कार्यकारी परिषदेवर फेरनिवड करण्यात आली.  प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी फेरनियुक्ती केली.

छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरेच्या कार्यकारी परिषदेवर फेरनिवड करण्यात आली. डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाच्या मावळत्या कार्यकारी मंडळामध्ये केलेल्या विद्यापीठ स्तरावरील विशेष कार्याचा उल्लेख करत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी त्यांची फेरनियुक्ती केली. या अगोदरही  डॉ. उल्हास शिंदे यांनी विविध कार्यकारिणी मंडळावर कर्तव्य बजावले आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विधिसभा सदस्य, अध्यक्ष अभ्यासमंडळ, अधिष्ठाता अभियांत्रिकी विद्याशाखा इत्यादींचा प्रामुख्याने समावेश करता येईल. या व्यतिरिक्त डॉ. उल्हास शिंदे हे इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, न्यू. दिल्ली (आय.एस.टी.इ.) चे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य तसेच कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, औरंगाबाद चॅप्टरचे अध्यक्ष आहेत. डॉ. उल्हास शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता असताना प्रथमच ओपन इलेक्टिव्हची संकल्पना राबविली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध कंपनीशी संलग्न विषय निवडण्याची सवलत देण्यात आली. त्यासोबतच त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता यावा, यासाठी इनप्लांट ट्रेनिंगची संकल्पनाही राबविली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये कार्यकारी मंडळाचे सदस्य असताना अभियांत्रिकीमध्ये ऑनर्स डिग्री ची संकल्पना अंगिकारण्यासाठी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना अनुक्रमे मेजर आणि मायनर डिग्री आत्मसात करण्याची संधी उपलब्ध असावी, यासाठी डॉ. उल्हास शिंदे यांनी वेळोवेळी प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असल्याने डॉ. उल्हास शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मध्ये तात्काळ फेरपरीक्षेची सुविधा अर्थात रेमिडिअल परीक्षा पद्धतीचा अवलंब केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याला महत्व दिले. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबतच कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव घेता यावा, प्रत्यक्ष कंपनीमध्ये काम करता यावे, यासाठी ते कार्यकारी मंडळावर असतांना अनिवार्य इंटर्नशिप ट्रेनिंगची संकल्पना राबविली. ज्यामध्ये विद्यार्थी अभियांत्रिकीचे शेवटच्या सत्रात प्रत्यक्ष कंपनीमध्ये प्रोजेक्टवर काम करतो.
अभियांत्रिकी शिक्षणाला पारंपरिक साचेबद्ध शिक्षण प्रणालीच्या चौकटीतून मोकळे करून कौशल्य आधारित शिक्षण प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांना उद्यमशील बनवून आत्मनिर्भर बनविणे हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मुख्य गाभा स्टार्ट-उप आणि स्किल डेव्हलपमेंट योजनांच्या माध्यमातून विद्यापीठ स्तरावर राबविला जात आहे.
डॉ. उल्हास शिंदे यांच्या फेरनिवडीबद्दल छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकर मुळे, अध्यक्ष  रणजित मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालय व रुग्णालयचे प्राचार्य डॉ. एस. सी. भोयर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. शेळके, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. जी. बी. डोंगरे तसेच छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.