नातवाला विजयी करून, आजीने घेतला जगाचा निरोप, अविस्मरणीय मत

विजयी उमेदवार विजय साठेंना 113 वर्षांच्या आज्जी सरूबाई साठेंचा मतदानरुपी नातवाला आशीर्वाद

0

पुणे : (कोळवण ) वाळेण (ता. मुळशी) येथील विजयी उमेदवार विजय साठे यांच्या आज्जी सरूबाी साठे या 113 वर्षांच्या होत्या. नातवाला एकप्रकारे विजयी करून, आज्जीने जगाचा निरोप घेतला.  मतदानाच्या दिवशी आपल्या नातवाला मतदान रुपी आशीर्वाद देऊन रात्री अखेरचा श्वास घेतला.

मतदानाच्या दिवशी आपल्या नातवाला मतदान रुपी आशीर्वाद देऊन रात्री अखेरचा श्वास घेतला.  वॉर्ड 1 मध्ये विजय मुगुट साठे एकमताने विजयी झाले. त्यांच्या डेळ्यात अश्रू तरळले आणि त्या एका मताची किंमत  आठवणीने जाणवली. त्यांना 127 त रविरोधा उमेदवार संजय चिंधू साठे यांना 126 तर यशवंत किसन ढमाले यांनाा 13 मते पडली. विजय साठे यांना मिळालेले मोलाचे एक मत अविस्मरणीय असेच आहे. विजयीी उमेदवार विजय साठे यांच्या आजी सरुबाई शंकर साठे या 113 वर्षांच्या होत्या. मतदानाच्या दिवशी आपल्या नातवाला मतदानरुपी आशीर्वाद देऊन त्यांनी रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आजीचे मत त्यांच्या विजयासाठी निरणायक ठरले. त्यामुळे विजय मुगुट साठे यांच्या एका डोळ्यात अश्रू तर एकात आनंद होता. मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी 10 वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, एकूण 14 टेबलवर मोजणी करताना 8 फेऱ्या ठेवल् होत्या. तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरुम उघडण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.