विमान दुर्घटना ‘टेबलटॉप रनवे’मुळे झाल्याचा अंदाज

एअर इंडियांचे विमान दुर्घटनाग्रस्त; रनवेहून पुढे हे विमान निघून गेल्यामुळे दुर्घटना

0

केरळ : केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचे एक विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला. 121 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत.
दुबईहून कालिकत येथे येणारे एअर इंडियांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. रनवेहून पुढे हे विमान निघून गेले, त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. एअर इंडियाचं विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळले आणि विमानाचे दोन तुकडे झाले.अपघातानांतर फायर टेंडर आणि अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू होते. विमानाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 7.45 च्या सुमारास ही घटना घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, कोझिकोडमधील करिपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसरले. विमानात दोन पायलटसह सहा क्रू मेंबर्स होते. तर विमानात 191 प्रवासी प्रवास करत होते, ज्यात 10 मुलांचा समावेश आहे.कोझीकोड विमानतळावर हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, या अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या विमानतळाचा रनवे ‘टेबलटॉप रनवे’ असल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. पण हा टेबलटॉप रनवे म्हणजे नेमके काय? ‘टेबलटॉप रनवे’ या शब्दातच याचा अर्थ दडलेला आहे. म्हणजेच, एखाद्या पठारावर हा रनवे असतो. हा रनवे जिथे सुरू होतो आणि जिथे संपतो, अशा दोन्ही टोकांना दरीसारखा खोलगट भाग किंवा उतार असतो. खरंतर बाहेरील देशांत बहुतांश ठिकाणी समांतर रनवे असतात. त्यामुळे विमान लँड करतना किंवा टेक ऑफ करताना फारशा समस्या उद्भवत नाहीत. भारतात मात्र समांतर रनवे सरसकट आढळत नाहीत. भारतात कोझीकोडप्रमाणेच मँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मिझोरममध्ये असलेलं लेंगपुई विमानतळ येथील रनवेसुद्धा ‘टेबलटॉप रनवे’ आहेत. डोंगराळ भागातून किंवा टेकडीच्या माथ्यावर हे रनवे असल्यामुळे अनेकदा वैमानिकांचा रनवे पठारावर नसून टेकडीखालच्या भागात जमिनीवगत असल्याचा भास होतो. यामुळेच अपघात घडतात.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.