मुंबई : महाराष्ट्रात सोमवार ( ता.२३ ) रात्रीपासून आज मंगळवार ( ता. २४ ) रात्रीपर्यंत ( कोरोनाच्या १८ नविन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगली मधील इस्लामपूरचे ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण – डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.
नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ८ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आसल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
लोकानी सरकारचया सुचनांच पालन करण्याची विनंती टोपे यांनी जनतेली केली आहे. तसेच पुर्वी कोरोना विष्णू बाधीत रुग्नातील काही कोरोनाचे रूग्न पुर्णपणे कोरोना मुक्त झालेचेही त्यांनी सांगीतल.