विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसदर्भात पुढील सुनावणी 14 ऑगस्टला

परीक्षा न घेण्याचा 'एसडीआरएफ'चा निर्णय

0

नवी दिल्ली : यूजीसीने दिलेल्या गाईडलाईन्स विरोधात युवासेनेसह विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एसजी तुषार मेहता यांना वेळ दिला. संपूर्ण देशभरात परीक्षा होणार आहे, मात्र केवळ दोन राज्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, असे एसजी तुषार मेहता म्हणाले. अन्य राज्यांची प्रतिज्ञापत्रे बाकी असल्याचे विचारात घेऊन सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी मेहता यांनी केली. पुढील सुनावणी 14 ऑगस्ट रोजी होणार आहे..
महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एसजी तुषार मेहता यांना वेळ दिला. संपूर्ण देशभरात परीक्षा होणार आहे, मात्र केवळ दोन राज्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, असे एसजी तुषार मेहता म्हणाले. अन्य राज्यांची प्रतिज्ञापत्रे बाकी असल्याचे विचारात घेऊन सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी मेहता यांनी केली. पुढील सुनावणी 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. ‘यूजीसी’ने देशभरातील विद्यापीठांना तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची सक्ती केली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या परीक्षा घेण्यात याव्यात असे यूजीसीने म्हटले आहे. दरम्यान 31 विद्यार्थ्यांनी ‘यूजीसी’च्या परीक्षासक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ‘यूजीसी’ने दिलेल्या गाईडलाईन्स विरोधात युवासेनेसह विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जीव धोक्यात घालणे हिताचे नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ‘यूजीसी’ने देशभरातील विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्र, पंजाब, दिल्लीसह 13 राज्यांच्या सरकारचा कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेण्यास विरोध आहे. ‘यूजीसी’ मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. 640 पैकी 454 विद्यापीठांनी परीक्षा घेतल्याचे यूजीसीने सांगितले आहे. ‘यूजीसी’ने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत म्हटले की, 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे उद्दीष्ट विद्यार्थ्यांचे भविष्य सांभाळणे हे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या पुढील वर्षाच्या अभ्यासाला उशीर होऊ नये आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा थांबवली आहे, या भरवशावर न राहता विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी सुरू ठेवावी, असेही यूजीसी म्हटले.
… तर परीक्षा घेण्याचा पर्याय ठेवणार – ठाकरे सरकार
आतापर्यंत झालेल्या सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल, असा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात घेतला होता. ज्यांना आपण मिळालेल्या गुणांपेक्षा अधिक गुण मिळवू शकलो असतो, असे ज्यांना वाटेल, त्यांच्यासाठी आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा परीक्षा घेण्याचाही पर्याय ठेवणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.