महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता ‘कृष्णकुंज’, समस्या अनेक; उपाय एक

'मनसे' संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला टोला, राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनेकांच्या सुटल्या समस्या

0

मुंबई :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाकडून अनेक निर्बंध लादले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून अनलॉक अंतर्गत काहीअंशी सूट दिली. परंतु अनेक गोष्टींवर निर्बँध कायम होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विविध संघटनांच्या प्रतिनिधी मागण्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे ‘कृष्णकुंज’वर दाखल होत आहेत.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनेकांच्या समस्याही सुटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारला टोला लगावला. समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे, कृष्णकुंज, असे ट्वीट करत संदीप देशपांडेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “ राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ शिवाजी पार्क, दादर मुंबई 28, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. राज्य शासनाने आमच्यावरीलही निर्बँध हटवावेत यांसारख्या विविध मागण्या घेऊन बेस्टचे कंत्राटी कर्मचारी, केबलचालक, कोळी बांधव, बँडवाले, वारकरी, मूर्तीकार, डबेवाले, जिमचालक, कोळी महिला, वीजबिल ग्राहक, पुजारी, डॉक्टरांचे शिष्टमंडळ, ‘अदानी’चे अधिकारी इत्यादींनी राज यांच्याकडे धाव घेतली होती. या मागण्यांवर राज ठाकरेंनी थेट संबंधित मंत्र्यांना फोन लावत त्यावर तोडगा काढला होता. यातील अनेकांच्या समस्याही सुटल्या आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.