एमपीएससीची परीक्षा 21 मार्चला होणार; विद्यार्थी निर्णय मान्य करणार?

आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार

0

मुंबई : मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. एमपीएससीची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. आता हे विद्यार्थी सरकारचा 21 मार्च रोजीचा निर्णय स्वीकारणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

या परीक्षेसाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरातील केंद्रांच्या ठिकाणी वास्तव्याला येऊन राहिले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना राहण्याचा आणि खाण्याचा खर्च करावा लागत आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्याने या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे विद्यार्थी 21 तारखेच्या परीक्षेचा निर्णय कितपत मान्य करणार, हे आता पाहावे लागेल. मुळात सरकारने 21 तारखेला परीक्षा घेण्याच्यादृष्टीने तयारी केली असले तर मग ती 14 तारखेला का होऊ शकत नाही, असा सवाल अनेक विद्यार्थी विचारत आहेत. काहीवेळापूर्वीच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयावर भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हेदेखील पाहावे लागेल.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
येत्या आठ दिवसांत ही परीक्षा घेणारच, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही घोषणा करताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीबद्दलही मुख्यमंत्री बोलले. मग ही परीक्षा होताना शासकीय यंत्रणेची परीक्षेची तयारी, सुपरव्हिजन करणारे शिक्षक, वर्गखोल्या, त्यात सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आदी विषयांवर मुख्यमंत्री बोलले. आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. विद्यार्थ्यांची सोय करण्यापासून पेपर गोळा करुन गठ्ठे बांधण्यापर्यंत नियोजन करावे लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोके वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत, त्यांची टेस्ट केली जाणे महत्त्वाचे आहे. ज्यांना लस दिली गेली तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नाही तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत’, अशी सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.