आध्यात्मिक आघाडीचे आंदोलन; नगरपरिषदेने रातोरात उखाडला मंडप

अध्यात्मिक आघाडीकडून सातत्याने मंदिरे खुली करण्याची मागणी

0

उस्मानाबाद :  राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी आध्यत्मिक आघाडीचे बेमुदत ठिय्या आंदोलन तुळजापूर येथे सुरू आहे. मात्र, आता आंदोलनासाठी उभारण्यात आलेला मंडपच नगरपरिषेदेने उखडून टाकल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे.

अनेक दिवसांपासून अध्यात्मिक आघाडीकडून सातत्याने मंदिरे खुली करण्याची मागणी होत आहे. मात्र, यावर राज्य सरकार निर्णय न घेतल्याने तुषार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली  आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिरासमोर आंदोलन सुरू केले होते. मात्र, आता नगरपरिषदेने आंदोलनाचा मंडप काढून टाकल्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्याकरिता मंडप काढला तरी सकाळी रणचंडी यज्ञ व आंदोलन करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याला आम्ही बळी पडणार नाही, जोपर्यंत मंदिर खुले होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने मंदिरे खुली न केल्यास मंदिरांचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करू, या भाजप्रणित अध्यात्मिक आघाडीच्या इशाऱ्यानंतर नाशिकमधील ऐतिहासिक मंदिरांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. प्रशासनाकडून याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कपालेश्वर मंदिरासह नाशिकमधील इतर देवळांच्या परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.