तीन नव्या कृषी कायद्यांमधील त्रुटी आणि उणिवांबाबत मंत्रालयात खलबते

आज मंत्रिमंडळ उपसमितीची दुपारी दोन वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार

0

मुंबई : राजधानी दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. अशातच राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनीसुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बाईकवरुन दिल्ली गाठली आहे.

बच्चू कडू यांनी तेथील आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक आज दुपारी दोन वाजता  पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अधिनियमांतील त्रुटी आणि उणिवांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

शेतकरी आंदोलनाचा पेच सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा पुढाकार; संघटनांची समिती बनवण्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि काही शेतकरी संघटनांमधील वाद मिटविण्यासाठी समिती स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी रस्ता मोकळा करण्याच्या याचिकेवर काल (गुरुवारी) सुनावणी झाली. हा देशव्यापी मुद्दा आहे. सरकारी संस्थांशी वाटाघाटी अयशस्वी ठरली. म्हणून आम्ही एक समिती स्थापन करू ज्यात सरकारसह आंदोलक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. तसेच देशातील त्या शेतकरी संघटनांचे लोक असावेत जे अद्याप आंदोलन करत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

संसदेने शेतकर्‍यांशी संबंधित 3 कायदे पास केले आहेत. त्यांची नावे आहेत – शेतकरी उत्पादन व वाणिज्य कायदा, किंमत विमा आणि शेती सेवा कायदा व शेतकऱ्यांचा करारनामा आणि आवश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे तिन्ही विधायके कायदे झाले आहेत. यामध्ये शेतकर्‍यांना खाजगी कंपन्या व व्यापाऱ्यांकडून पिकाचे उत्पादन व विक्री कराराचा ठेका घेत कृषी बाजाराबाहेर पीक विकायला स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पण पंजाबच्या शेतकरी संघटनांबरोबरच हरियाणा आणि पश्चिम यूपीतील काही संघटनाही याला शेतकरीविरोधी म्हणत आहेत. हे तीनही कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे. देशातील मुख्य वाणिज्य आणि उद्योग मंडळ एसोचॅमने  म्हटले आहे की, देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. एसोचॅमने सांगितले आहे की, शेतकरी आंदोलनामुळे देशाला रोज 3,000 ते 3,500 कोटींचे नुकसान होत आहे. शेतकरी आंदोलन जवळपास तीन आठवड्यांपासून सुरु आहे. 21 दिवसांमध्ये जवळपास 75 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं एसोचॅमने म्हटले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.