सनई-चौघड्याचे मंजूळ सूर 27 नोव्हेंबरपासून गुंजणार; यंदा वर्षभरात लग्नसराईचे 53 मुहूर्त

गुरू-शुक्र अस्तामुळे तारखा कमीच; कोरोना प्रादुर्भावामुळे घ्यावी लागणार काळजी

0

जळगाव  : दरवर्षी मोठ्या थाटामाटात लग्नसमारंभ होतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असून दुसरीकडे गुरू आणि शुक्र अस्त आल्याने यंदा कर्तव्य आहे अशा वधू-वरांसाठी वर्षभरात ५३ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत. तुळशी विवाह झाल्यानंतर लगीनघाईचे दिवस सुरू होतात. यंदा २७ नोव्हेंबरपासून मुहूर्त सुरू होणार असून २७ जुलैपर्यंत ते चालणार आहेत. मेमध्ये सर्वाधिक मुहूर्त असल्याने हा महिना लग्नाच्या धामधुमीचा ठरणार आहे.

सगळीकडे पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती अजून कमी झालेली नाही. अशातच दोन महिन्यांनी सनईचे सूर वाजण्यास सुरुवात होईल. काेराेनामुळे वधू-वर पित्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यंदा वधू-वरांसाठी ५३ तारखा शुभमुहूर्त म्हणून आहेत. १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत गुरू अस्त, तर यानंतर मार्च, एप्रिलपर्यंत शुक्र अस्त असल्याने शुभ मुहूर्त नाहीत. यावर्षी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात एकूण १० मुहूर्त असल्याने वधू-वरपित्याची आतापासूनच लगीनघाई सुरू झाली आहे. गतवर्षी गुरूचा अस्त असतानाही ८६ मुहूर्त होते. मात्र, यावर्षी गुरु अस्त लग्न सराईत आल्यामुळे ५३ मुहूर्त आहेत. गतवर्षीपेक्षा मुहूर्त कमी दिसत आहेत.

गुरू-शुक्र अस्तामुळे तारखा कमीच; कोरोना प्रादुर्भावामुळे घ्यावी लागणार काळजी

दिवाळीनंतर तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरुवात होणार आहे. सनई चौघडे वाजणार आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये २७, २८ यानंतर डिसेंबर ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ अशा तारखा आहेत. तसेच २०२१ मध्ये जानेवारीत ३, ५, ६, ७, ८, ९,१०, फेब्रुवारीत १५, १६, यानंतर शुक्र अस्त आल्याने मार्चमध्ये लग्नतिथी नसून थेट एप्रिल महिन्यात २२, २४, २५, २६, २८, २९, ३०, मे महिन्यात १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१, तसेच जून महिन्यात ४, ६, १६, १९, २०, २६, २७, २८, जुलै महिन्यात १, २, ३, १३, अशा तारखा आहेत.

साखरपुड्याच्या तारखा । नोव्हेंबर महिन्यात २१, २४, २७, ३०, डिसेंबरमध्ये १, ७, ९, १०, १५, १७, १९,२२, २३, २४, २७ या तारखा आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.