बिहारमध्ये आज शेवटची लढाई; पीएम मोदींचे नवे रेकॉर्ड बनवण्याचे आवाहन

बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान सुरू

0

पाटणा : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघांमध्ये आज (7 नोव्हेंबर) सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील मतदार आज एकूण 1 हजार 208 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह आज वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक आहे. या ठिकाणी 7 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील मतदारांना मतदानाचा नवा रेकॉर्ड बनवण्याचे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सुरू आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे की, सर्वांनी जास्तीत-जास्त संख्येत मतदान करुन लोकशाहीच्या या सोहळ्याचे भागीदार बना. मोठ्या संख्येंने मतदान करुन नवे रेकॉर्ड  करा. सर्वांनी मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत बिहारमधील मुजफ्फरपूर मतदारसंघात सर्वाधिक 28 उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. तर जोकीहाट, बहादूरगंज, त्रिवेणीगंज आणि ढाका या मतदारसंघात प्रत्येकी 9 उमेदवार आमने-सामने आहेत. सीमांचल या मुस्लिम बहुल भागात जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर यादव बहुल कोसी आणि ब्राह्मण बहुल मिथिलांचलमधील काही जागांवरही ‘कांटे की टक्कर’ होण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या टप्प्यात महाआघाडीतून काँग्रेसचे 25 तर आरेडीचे 46 उमेदवार रिंगणात आहेत. तर एनडीए कडून भाजप 35 जागांवर आणि जेडीयू 37 जागी लढत आहेत. 5 ठिकाणी सीपीआय (माले), तर 2 ठिकाणी सीपीआयने आपले उमेदवार उतरवले आहेत. याचबरोबर व्हीआयपी 5 तर ‘हम’ एका जागेवर निवडणूक लढवत आहे. तर एमआयएमआयएम च्या असदुद्दीन ओवेसी यांनी जवळपास 2 डझन जागांवर दंड थोपटले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास 53.51 टक्के इतके मतदान झाले. 94 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानप्रक्रियेत मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, तेजस्वी यादव, लोजप प्रमुख चिराग पासवान या दिग्गज नेत्यांनी मतदान केले. तर तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यासह 1450 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 10 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडी विरुद्ध भाजप आणि नितीश कुमार  यांच्या जनता दल युनायटेड जेडीयू यांच्यात लढत होत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.