बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार राज्य शासनाकडून मदत

जालना जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ, एकाच महिन्यांत तिघांचा बळी

0

औरंगाबाद ,  औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे, जालना जिल्ह्यात  या बिबट्याने धुमाकूळ घातला असून एकाच महिन्यांत तिघांचा बळी घेतला. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी १५ लाख म्हणजे ४५ लाखांची मदत दिली जाणार आहे, त्यासंबंधीचा अहवाल वनविभागाने तयार केला आहे.

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे,  , जालना जिल्ह्यात  या बिबट्याने धुमाकूळ घातला असून एकाच महिन्यांत तिघांचा बळी घेतला. त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. त्यामुळे बिबट्या पाळीव प्राण्यांबरोबरच मानवी वस्तीवर हल्ले करून त्यांना जखमी करत आहे. आता तर बिबट्याने शेतकऱ्यांवरच हल्ले सुरू केले आहे, हे जालना जिल्ह्यातील जामखेड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव येथे घडलेल्या घटना याची ताजे उदाहरणे आहेत. या वरील ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. जामखेड येथे ७ नोव्हेबर रोजी सुभद्राबाई पंढरीनाथ मस्के (५०) आणि पैठण तालुक्यातील आपेगावात १६ नोव्हेंबर रोजी अशोक सखाराम औटे तसेच कृष्णा अशोक औटे या पिता पुत्राचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे या भागातील शेतकऱ्यांत भितीचे वातावरण परसले आहे, मृत्युमुख पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाच्या वतीने प्रत्येकी १५ लाखांची मदत दिली जाणार आहे, त्यासंबधीचा प्रस्ताव वन विभागाने तयार केला आहे. हिंस्त्र, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसास राज्य शासनाच्या वतीने १५ लाखांची मदत दिली जाते, ही मदत ३ लाखांचा धनादेश आणि १२ लाख रुपये हे राष्ट्रीयकृत बँकेचे प्रमाणपत्राच्या स्वरुपात दिले जाते, त्यासबंधीचा अध्यादेश १८ नोव्हेंबर २०१८ रोजी जारी करण्यात आला आहे आदेशानुसार बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत दिली जाणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.