दिवाळीतील ‘लक्ष्मी’ बनविण्याऱ्या केरसुणी कारागिरांचे हात लक्ष्मीविनाच…

, केरसुणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्यांचे दर गगनाला भिडल्याने त्यांच्या पदरी निराशा

0

नांदेड  : अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथील 10 ते 15 कुटुंब केरसुणी बनविण्याचे काम करत आहेत. ही कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून केरसुणी तयार करण्याच्या व्वसायात आहे. मात्र, दिवसरात्र मेहनत करून एक कुटुंब 50 ते 60 केरसुणी तयार करतात. एका केरसुणीला बाजारात 25 ते 30 दर मिळतो. मात्र, केरसुणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य यांचे दर गगनाला भिडल्याने त्यांच्या पदरात निराशा पडत आहे.

नांदेड – स्वच्छ आणि प्रसन्न असलेल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य असते, अशी श्रद्धा असल्याने दिवाळसणात आपल्याकडे केरसुणी अर्थात झाडूची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला झाडूची खरेदी करून लक्ष्मीपूजनाला त्याची रीतसर पूजा केल्या जाते. मात्र, यंदा केरसुणी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे केरसुणी बनवणारे हात मात्र लक्ष्मीविनाच राहात आहेत. केरसुणी बनवणारे शेकडो पारंपरिक व्यावसायिक ‘या धंद्यात आता राम उरला नाही’, अशी प्रतिक्रिया ते देत आहेत. तर, दुसरीकडे अंगवळणी पडलेला हा व्यवसाय असल्याने कमी फायद्यात असूनही केरसुणी बनवण्याचे काम सुरूच आहे. केरसुणी बनविणारे कारागिर याबाबत प्रतिक्रिया देताना.
बाजारात मागणी नसल्याने कारागिर अडचणीत -अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथील 10 ते 15 कुटुंबे केरसुणी बनविण्याचे काम करीत आहेत. हे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून केरसुणी तयार करण्याच्या व्यवसायात गुंतले. मात्र, दिवस-रात्र मेहनत करून एक कुटुंब 60 ते 70 केरसुणी तयार करतात. एका केरसुणीला बाजारात 25 ते 30 रुपये दर मिळतो. मात्र, केरसुणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य यांचे दर आकाशाला भिडले असल्याने त्यांच्या पदरात काही पडत नाही आहे. सध्या दिवाळी सणासाठी केरसुणीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, यंदा बाजारात केरसुणीला भाव मिळत नसल्याने हे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. दिवाळीत प्रत्येक घरात केरसुणी खरेदीली जाते. याकरिता एक कुटुंब दिवसातून 60 ते 70 केरसुणी बनवित आहेत. हे केरसुणी विकण्यासाठी नांदेड, अर्धापूर, लोहा, कंधार, वसमत, वारंगा आदी. मोठ्या शहराच्या बाजारात विकली जात आहेत. मात्र, केरसुणी बाजारात कमी दर मिळत असल्याने या व्यावसायिकाच्या पदरात काहीच पडत नाही आहे.

बाहेर राज्यातून आणावे लागते केरसुणीचे साहित्य -केरसुणी बनविण्यासाठी पनोळी (साहित्य) ही दुसऱ्या राज्यातून आणावी लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे पनोळी मिळत नाहीत. ज्या व्यावसायिकांनी लॉकडाऊनच्या अगोदर पनोळी जमा केली आहे. ते जादा दराने विकत आहेत. तसेच केरसुणी बांधण्यासाठी लागणारी दोरी अन्य साहित्याची किमती वाढल्याने एक केरसुणी तयार करण्यासाठी 15 ते 20 रुपये खर्च येत आहे. तसेच बाजारात विक्रीसाठी जाण्यासाठी लागणारा खर्च वेगळाच आहे. तर बाजारात या केरसुणीला प्रत्येकी 25 ते 30 रुपये दर मिळत आहे. यामुळे ज्या केरसुणीची दिवाळीत लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते, तीच लक्ष्मी केरसुणी बनविणाराच्या घरात नाही, अशी स्थिती आहे. केरसुणी बनविणारे कुटुंब पिढ्यानपिढ्यापासून झोपडीतच -पार्डी (म.) येथील 10 ते 15 कुटुंबांचा हाच एकमेव व्यवसाय आहे. दोन ते तीन पिढ्यांपासून हे लोक याच व्यवसायात गुंतले आहेत. मात्र, अनेकांच्या घराचे पत्रे देखील बदलले नाहीत. पावसाळ्यात अनेकांच्या घरात पावसाचे पाणी पडते तर, काही कुटुंबांचे वास्तव्य अजूनही झोपडीतच आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.