घराच्या अंगणात केरकचरा काढणाऱ्या महिलेची सोनसाखळी चोरली

वर्ध्यात दिवसाढवळ्या चोरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना चित्रित

0

वर्धा : अंगणात आजी झाडू मारत होत्या. दिवसा ढवळ्या घराच्या अंगणात सोन साखळी खेचण्याची चोरट्याची मजल गेली आहे.  एका तरुणाने पाळत ठेवून त्यांची पाठ वळताच गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि  पळून गेला. दरम्यान, आजी अंगणात पडल्याने तिला प्रतिकारही करता आला नाही.

यशवंत नगर येथे सकाळी महिला अंगणात झाडू मारत असताना एका तरुणाने पाळत ठेवून त्यांची पाठ वळताच गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि  पळून गेला. दरम्यान, आजी अंगणात पडल्याने तिला प्रतिकारही करता आला नाही. एक तरुण श्वानासोबत उभा राहिला. काही वेळ श्वानासोबत घालविला आणि महिला घरात जाताना तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळवून नेली. ही घटना काल सकाळी घडली. या सर्व घटनेचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधीदेखील सोनसाखळी पळवून नेण्याच्या घटना शहरात घडल्या. मात्र त्याचे आरोपी पोलिसांना आढळले नाहीत. शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.