जालन्यात शेअर्ससधून भरपूर नफ्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद

बनावट वेबसाइट, शेअरच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक

0

जालना   :  जालना शहरातील शिक्षक चौधरीनगर,  यांना विजय रावत, बिपीन रावत, आर्यन तोमर, राहूल जैन या नावाने कॉल करून ,अशी बनावट नावे सांगून, शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो म्हणत ३० हजार भरून घेतले. आरोपीतील एकाने फोन करून त्याचा मोबदला सांगितला. शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो म्हणत ३० हजार भरून घेतले. पहिल्याच आठवड्यात १८ हजार रुपये ग्राहकाला मिळवून दिले. यानंतर अडीच लाख भरा, प्रत्येक हप्त्याला तीस हजार रुपये येईल, असे आश्वासन देऊन मध्य प्रदेशात बसून जालनेकरांची लूट करणाऱ्या पंचवीशीतील पाच जणांची आंतरराज्य टोळी जालन्यात पकडली आहे.

जालन्यातील लक्ष्मण कोंडिबा मुळे (५२, शिक्षक चौधरीनगर, जालना) यांना आरोपीतील एकाने फोन करून त्याचा मोबदला सांगितला. यानुसार मुळे यांनी १८ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन ३० हजार रुपये भरले. यानंतर त्यांना पहिल्याच हप्त्यात त्यांना १८ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. यानंतर अडीच लाख भरा नंतर आठड्याला ३० हजार रुपये येईल, असे सांगून पैसे भरून घेतले. परंतु, नंतर चालढकल केल्याने त्यांनी तक्रार दिली. यात हा प्रकार उघड झाला. www.moneygrowthsolution.com व www.redinvestore.com या वेबसाइटच्या माध्यमातून आरोपींनी शेअर मार्केट बाबत खोटी माहिती देऊन ती खरी असल्याचे भासवून जालन्यातील शिक्षकाची फसवणूक केली. मध्य प्रदेशातून त्यांना अटक करीत त्यांच्या ताब्यातून २ संगणक, हार्डडिस्क, लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणेशकुमार कैलासचंद्र केवळ (२४, कंवला, तहसील भानुसुरा), श्रीकांत देवकीसंजीत मीना (२३, कंवला), श्रीकांत देवकीसंजीत गौर (२२, सांजलपूर), मानसिंग रामदयाल गुजर (२३, कंवला), हन्नी मंगल तोतला (२५, बेगनपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या बँकेचे खाते पोलिसांनी संबंधीत बँकांना पत्र देऊन बंद केले आहेत. अजून दुसऱ्या कोणाची फसवणूक होणार नाही, या उद्देशाने ते बंद करून ठेवले आहेत. या आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, सहायक निरीक्षक संभाजी वडते, तराळ, पितळे, जारवाल, राऊत, सागर बावस्कर आदींनी केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.