जालन्यात चोरट्यांनी सीसीटीव्हीवर स्प्रे मारून एटीएम मशिनसह 28 लाख चोरून फरार

नागेवाडी येथे शनिवारी पहाटे घडला प्रकार, पोलिसांची पाच पथके घेताहेत शोध

0

जालना : जालन्यातील औद्योगिक वसाहतीतील असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी स्कोर्पिओ गाडीतून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . यात तब्बल २८ लाख ६७ हजार ६०० रुपये रोख रक्कम होती. शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या वेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्याने चोरट्यांची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. या खळबळजनक घटनेमुळे एटीएमच्या सुरक्षेवर पुन्हा-पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जालन्यातील औद्योगिक वसाहतीतील असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी स्कोर्पिओ गाडीतून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली  शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. यात तब्बल २८ लाख ६७ हजार ६०० रुपये रोख रक्कम होती.  या वेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्याने चोरट्यांची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. या खळबळजनक घटनेमुळे एटीएमच्या सुरक्षेवर पुन्हा-पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, जालना पोलिसांची पाच पथके या एटीएम चोरट्यांचा शोध घेत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील एनआरबी कंपनीजवळ एसबीआयची नागेवाडी शाखा आहे. या शाखेसमोर एटीएम मशीन लावले आहे. जालना-औरंगाबाद महामार्गाला लागूनच असलेल्या या एटीएम केंद्रात शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास एक चोरटा आला. त्याने जॅकेट घातलेले होते व तोंडाला रुमाल गुंडाळलेला होता. त्यानंतर त्याने एटीएम रूममध्ये प्रवेश केला व सोबत आणलेला स्प्रे एटीएम मशीनमधील सर्व्हिस कॅमेरा व एटीएम रूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर फवारला. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून दिसणे बंद झाले. त्यानंतर चोरट्यांनी एटीएम मशीनला रोप वायर बांधून कारच्या साह्याने जोरदार झटका दिला. त्यामुळे मशीन थेट गाडीजवळ येऊन आदळले. एटीएम रूमच्या काचा व फर्निचरही जोरदार झटक्यामुळे निखळले. त्यानंतर चोरट्यांनी एटीएम मशीन उचलून गाडीत टाकून धूम ठोकली. अवघ्या पंधरा मिनिटात हा सर्व प्रकार घडला. दरम्यान, एटीएमचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद झाल्याने बँकेच्या औरंगाबाद व मुंबई येथील एटीएम सुरक्षा टीमने बँक शाखा व्यवस्थापक संतोष अय्यर यांना कळवले. अय्यर यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षास संपर्क केला. नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, चंदनझिरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, सहायक निरीक्षक साळवे, उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी केली. मात्र, चोरटे मिळवून आले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी निरीक्षण करत पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला.

३२ लाखांचा ऐवज पळवला

एसबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष अय्यर यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी ४ लाखांचे एटीएम मशीन व रोख २८ लाख ६७ हजार ६०० रुपये, असा एकूण ३२ लाख ६७ हजार ६०० रुपये चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.