आज थंडावणार बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा

सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून रॅलीचा धडाका!

0

पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार आहे. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षांचे बडे नेत्यांकडून विविध भागात आज प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेते आज शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारात एकमेकांवर जोरदार हल्ला केल्याने ही निवडणूक अधिक लक्ष्यवेधी ठरली आहे.  बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार आहे. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षांचे बडे नेत्यांकडून विविध भागात आज प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आज दोन रॅली होणार आहेत. दुपारी १२ वाजता औरंगाबाद तर ३ वाजता पुर्णिया येथे नड्डा यांची सभा होणार आहे. तर मुख्यमंत्री नितीश कुमार आज मुजफ्फरपूर, महुआ आणि मनहर, अशा तीन ठिकाणी रॅली करणार आहेत. शेवटच्या दिवशी बिहारमध्ये भाजपची फौज! जे. पी. नड्डा यांच्यासह बिहारमध्ये आज भाजपचे अनेक नेते प्रचारासाठी उतरणार आहेत. भूपेंद्र यादव, अभिनेते आणि खासदार रवी किशन यांच्या आज चार रॅली होणार आहेत. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि संजय जैस्वाल यांच्यात प्रत्येकी ३ रॅली होणार आहेत. दुसरीकडे आरजेडी नेते तेजस्वी यादव भागलपूर, खगडिया, वैशाली आणि बेगुसराय येथे रॅली काढणार आहे. एकट्या भागलपूरमध्येच तेजस्वी यांच्या पाच रॅली आहेत. तर खगडीया आणि अन्य ठिकाणी प्रत्येकी ४ रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत. तर काँग्रेस नेते राजीव शुक्ला आज बिहार निवडणुकीसंदर्भात दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी मतदान

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला होणार आहेत. यामध्ये विधानसभेच्या ७१ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार ६६ उमेदवारांचं भवितव्य वोटिंग मशिनमध्ये बंद होईल. तर १४ लाख 6096 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.