सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा मार्च 2021 नंतरच, सहकार मंत्र्यांची माहिती

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती

0

कराड : राज्यातील सहकार संस्थांच्या निवडणुका आता मार्च 2021 नंतर होणार, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. कराडमध्ये राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नवीन कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

कराडमध्ये राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नवीन कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब पाटील बोलत होते. राज्यातील 30 हजार 820 सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने हळूहळू तयारी सुरू केल्याची माहिती आहे. टप्प्याटप्प्याने या निवडणुका घेण्यात येणार आहेत..सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 5 हजार 629 जणांचे पॅनलही मंजूर करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मात्र मार्च 2021 नंतरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे राजकारण तापणार आहे. राज्यात एकूण 45 हजार 276 सहकारी संस्थांची निवडणूक बाकी आहे. त्यापैकी क आणि ड वर्गातील 30 हजार 820 सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्राधिकरणाची तयारी सुरू आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुका 4 वेळा पुढे ढकलल्या!

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 17 मार्चला पुन्हा तीन महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला. पुढे अजून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता नव्या वर्षात या निवडणुका पार पडतील.

प्राधिकरणाकडून पॅनल तयार  :  क आणि ड वर्गातील 30 हजार 820 सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडून 5 हजार 629 जणांचं पॅनल तयार करण्यात आले आहे. या पॅनलमध्ये तज्ज्ञ व्यक्ती, निवृत्त सरकारी अधिकारी, खासगी लेखापरीक्षक, वकील यांसारख्या मंडळींचा समावेश करण्यात आल्याची माहितीही प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

सहकारी संस्थांना दिलासा  : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राज्यातील सहकारी संस्थांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लेखा परीक्षणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च 2021 पर्यंत तर लेखा परीक्षण 31 डिसेंबर 2020 पर्यंत करता येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यासंदर्भात आदेश काढला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.