‘आयफोन’ घेण्याचे स्वप्न या दिवाळीत होणार पूर्ण

'आयफोन 12 मिनी' आणि 'आयफोन 12 प्रो मॅक्स' वर घसघशीत सूट

0

मुंबई : आयफोन (आयफोन) वापरण्याची आवड आहे. बजेटच्या बाहेर आहे म्हणून आयफोन घेणे टाळत आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.अॅपल कंपनीच्या ‘आयफोन 12 मिनी’ आणि ‘आयफोन 12 प्रो मॅक्स’ वर  6000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे.

तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न या दिवाळीत पूर्ण करा. ‘अॅपल’ने काही दिवसांपूर्वीच आयफोन 12, आयफोन 12 प्रो, आयफोन 12 मिनी आणि आयफोन 12 प्रो मॅक्स, असे 4 नवे फोन लाँच केले होते. त्यापैकी आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रो च्या किमतीमध्ये सूट दिली. तसेच आयफोन 12 मिनी आणि आयफोन 12 प्रो मॅक्स हे दोन्ही फोन आता भारतामध्येही उपलब्ध झाले आहेत.

आयफोन 12 मिनी आणि 12 प्रो मॅक्सच्या किमतीत सूट मिळणार आहे.’आयफोन 12 मिनी’ हा अॅपलच्या सीरिजमधील सर्वात लहान आणि स्वस्त फोन आहे. 64 जीबी स्टोरेज मॉडलची किंमत 69,900 रुपये आहे. तर, 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडल्सची किंमत अनुक्रमे 74,900 रुपये आणि 84,900 रुपये आहे. ‘आयफोन 12 मिनी’ स्मार्टफोनला 5.4 इंची डिस्प्ले आणि ड्यूयल रियर कॅमेरा, वाईड आणि अल्ट्रा-वाईड अँगल लेंस असेल. ‘आयफोन 12 प्रो म्रॅक्स’बद्ल बोलायचे झाले तर, फोन ‘आयफोन’च्या या सीरिजमधील सर्वांत महागडा फोन आहे. 128जीबी व्हेरिअंटची किंमत 1,29,000 रुपये आहे. तर 256 जीबी व्हेरिअंट 1,39,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 512 जीबी व्हेरिअंटची किंमत 1,59,900 रुपये आहे. ‘आयफोन 12 प्रो म्रॅक्स’ला 6.7 इंच डिस्प्लेसह, ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे.  आयफोनच्या या दोन्ही फोन्समध्ये ग्राहकांना मोठी सूट मिळण्याची शक्यता आहे. ‘आयफोन 12 मिनी’च्या खरेदीसाठी तुम्ही एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरले तर 6,000 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. तर ‘आयफोन 12 प्रो म्रॅक्स’च्या खरेदीसाठी एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास 5,000 रुपयांची सूट मिळेल. एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड वापरल्यास या दोन्ही स्मार्ट फोनवर 1500 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळेल. अॅपलच्या स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही जुन्या आयफोनच्या बदल्यात नवीन आयफोनही घेऊ शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये ‘आयफोन 12 मिनी’ वर 22,000 रुपये आणि आयफोन 12 प्रो मॅक्सवर 34,000 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. मग या दिवाळीत आयफोन नक्की घरी घेऊन या!

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.