सरकारी सेवेच्या अटींचे पालन न केल्याने डॉक्टरांचे वारसदार विमा अर्ज नाकारले

विम्याचे अर्ज फेटाळून राज्य सरकार डॉक्टरांचा अपमान करत आहे : डॉ. अविनाश भोंडवे,

0

नाशिक  : कोरोना युद्धात राज्यातील ५७ खासगी डॉक्टरांना जीव गमवावे लागले असून त्यांनी योजनेच्या अटी-शर्तींनुसार शासकीय सेवा न दिल्याचे कारण देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे ५० लाखांच्या विमा संरक्षणाचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. ५० लाखांच्या कोरोना कवच विमा संरक्षणात सध्या फक्त शासकीय सेवेतील डॉक्टरांचाच समावेश अाहे. बळी गेलेल्या खासगी डॉक्टरांच्या कुटुंबीयांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

गेल्या सहा महिन्यांत बाधितांवर उपचार करीत असताना राज्यातील ५७ खासगी डॉक्टरांचा बळी गेला आहे. यात मुंबई १५, ठाणे ८, पुण्यातील ६ यांच्यासह अन्य जिल्ह्यांतील खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. कोविड काळात सेवा बजावताना प्राण गमवावा लागलेल्या खासगी डॉक्टरांनाही ५० लाखांच्या विमा संरक्षण योजनेत समाविष्ट करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केली होती. १५ सप्टेंबरच्या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे आयएमएचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात या दिवंगत डॉक्टरांच्या कुटुंबीयांचे अर्ज फेटाळण्यात येत असल्याने खासगी डॉक्टरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. खासगी रुग्णालयाचे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आणि सर्व शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे कोविड विमा संरक्षण लागू करण्यात आले आहे. ही विमा रक्कम लाभार्थींना मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मृत्यू कोविड १९ च्या बाधेमुळे व या कामाशी संबंधित असल्यामुळे झाला, असे राज्य शासनाने प्रमाणित करून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला कळवावे लागते. मात्र खासगी डॉक्टर्सनी या योजनेच्या अटी-शर्तींनुसार सरकारी कोविड सेंटर्समध्ये सेवा न दिल्याने त्यांचे अर्ज फेटाळल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सन्मान नाही तर पण अपमान तरी करू नका!

कोरोना रुग्णांना सेवा देताना बळी गेलेल्या खासगी डॉक्टरांना शहिदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे करीत आहोत. सन्मान तर दूरच, साध्या शोकसंदेशाने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन नाही, उलट त्यांचे विम्याचे अर्ज फेटाळून राज्य सरकार डॉक्टरांचा अपमान करीत आहे. डॉ. अविनाश भोंडवे, आयएमए

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.