मनगुत्तीत छत्रपती शिवाजी महाराजांचाच नाही तर पाच महापुरुषांचे पुतळे उभारणार

बेळगावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पाच पुतळे स्थापणार

0

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला आहे. मनगुत्ती गावात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच नाही तर एकाच ठिकाणी पाच महापुरुषांचे पुतळे उभारले जाणार आहेत. मनगुत्ती गावप्रमुख शरद पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
दरम्यान, बेळगाव सीमाभागासह संपूर्ण कर्नाटकचे आणि महाराष्ट्राचे लक्ष मनगुत्ती गावाकडे लागले होते. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मनगुत्ती आणि अन्य तीन गावांच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, पुतळा हटविण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारने हटवला.
सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटविण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल उपस्थित करण्यात आला. हे प्रकरण समोर येताच बेळगाव ते महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणी कर्नाटक सरकारविरोधात आंदोलने करण्यात आली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवभक्त आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर, मनगुत्ती गावातही याचे पडसाद उमटले. हे सर्व पाहता, कर्नाटक सरकारने सावध भूमिका घेत आठ दिवसांत शिवरायांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मनगुत्ती गावात फक्त शिवाजी महाराजांचाच नाही, तर पाच महापुरुषांचे पुतळे स्थापन होणार आहेत. मनगुत्ती गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्त होत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.