जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचा क्वॉरन्टाईनचा निर्णय

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने टेड्रॉस यांनी दिली ट्विटरवरून माहिती

0

मुंबई : जगभरातील कोरोनाचा कहर सुरु आहे. सामान्यांपासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांना कोरोनाची लागण झाली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस यांनी स्वत: क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. “काही दिवसांपूर्वी मी अशा व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो, ज्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे,” असे टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस यांनी सांगितले.

टेड्रॉस यांनी ट्विटरवरून यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्वीट केले आहे की, “मी अशा व्यक्तीच्या संपर्कात आहे, ज्याची कोविड 19 च्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी पूर्णत: ठीक असून कोणतीही लक्षणे नाहीत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार मी येत्या काही दिवसांसाठी स्वत:च क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. घरातूनच मी काम करणार आहे.” त्यांनी पुढे लिहिले आहे की, “आपण सर्व आरोग्य मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. याद्वारे आपण कोविड 19 च्या प्रसाराची साखळी तोडून आरोग्य यंत्रणांचे रक्षण करु शकतो. जागतिक आरोग्य संघटनेचे माझे सर्व सहकारी आणि मी जीव वाचवण्यासाठी आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने काम करत राहणार आहोत.”

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.