“मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी”

... अशी उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केली व्यक्त

0

कोल्हापूर : “सगळीच सत्व परीक्षा मराठा समाजाने द्यावी, अशी भूमिका काही विचारवंतांनी घेतली असून हे चुकीचे आहे”, असे सांगतानाच प्रत्येकवेळी मराठा समाज समन्वयाची भूमिका घेणार नाही. आधीच मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी झाली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केली

“एमपीएससी मध्ये यशस्वी होणारे तरुण केवळ एक टक्का आहे. खासगी क्षेत्रात तरुणांना संधी मिळावी, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. बंद असलेली ‘सारथी’ संस्था पुन्हा मजबूत करावी”, अशी मागणी राजेंद्र कोंढरे यांनी सरकारला केली आहे. “आम्ही ओबीसीमध्ये आलो आहे, वड्डेटीवार यांचा काहीतरी गैरसमज आहे. संधी मिळाली नाही तर हातात दगड घेणारच ना?”, असेही ते म्हणाले “सारथीचे उपकेंद्र कोल्हापूरला झाले पाहिजे. आरक्षणाची चोरी होते हे उघड आहे. मात्र, राजकरणामुळे हे दाबले जाते आहे. त्यामुळे मराठा समाज भरडला जातो आहे. सारथीमध्ये अजित पवार यांच्या कामाच्या वेगाला तग धरणारी यंत्रणा त्याठिकाणी नाही”, असेही ते म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.