‘चाळणीवाला’ या कवितासंग्रहाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद

जगविख्यात कवी ख. र. माळवे (उदापूरकर) यांचा काव्यसंग्रह ‘चाळणीवाला’

0

औरंगाबाद :  खंडू रघुनाथ माळवे-खरमा उर्फ जगविख्यात कवी ख. र. माळवे (उदापूरकर) यांचा काव्यसंग्रह ‘चाळणीवाला’ हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी अनुदान दिलेला  २०१३ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्रिमंडळ यांच्या हस्ते प्रकाशित झाला. ‘चाळणीवाला’ हा काव्यसंग्रह आई-वडील यांना अर्पण केला असून; ज्या माता-पित्याने रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करीत कवीला घडविले. त्याची आठवण कायम स्मरणात , शाश्वत राहावी म्हणून त्यांनी आपल्या कवितासंग्रहाला ‘चाळणीवाला’ हे नाव दिले.

‘चाळणीवाला’ हा मराठी काव्य क्षेत्रात आई-वडील यांच्या जीवनावर आधारित असलेला एकमेव काव्यसंग्रह ठरला आहे.
कवी खंडू रघुनाथ माळवे यांनी ४६७० कविता लिहून एक विश्वविक्रम निर्माण केलेला आहे; त्यांच्याच साहित्यावर संशोधकांनी पीएचडी (डॉक्टरेट) पदवी संपादन केली. कवी खंडू रघुनाथ माळवे यांचे वडील रघुनाथ हरिबा माळवे हे कलाकार होते. ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात गावोगावी वणवण भटकत पत्र्याच्यापासून चाळणी, चहाची गाळणी व मुलांची खेळणी बनवून विकत असत; चाळणीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांना गावोगावी व शिवारी ‘चाळणीवाला’ म्हणून ओळखत असत. पूर्वी घरोघरी त्यांच्याच चाळण्या असायच्या. आई-वडिलांची शिकवण आम जनतेला कळावी म्हणून या काव्यसंग्रहाला ‘चाळणीवाला’ हे शीर्षक दिले. कवी खंडू रघुनाथ माळवे द्वारा लिखित काव्यसंग्रह हा माणसाच्या आजारांचे विश्लेषण करणारा आणि निदान करणारा ‘चाळणीवाला’ हा चिकित्सक आहे. कवी म्हणतात, “मी कोणी दार्शनिक नाही. मी तुमच्या रोगांचे विश्लेषण करील, निदान करील आणि त्यावर औषध सांगेल. मात्र जेव्हा तुम्ही रोगमुक्त व्हाल तेव्हाच जाणाल की, स्वास्थ काय असते. ते स्वास्थ म्हणजे शब्दाने व्यक्त करता येत नाही. फक्त अनुभवानेच कळू शकेल म्हणूनच आत्मनिर्भरतेच्या जोरावर आत्मभान ठेवून निसर्ग हाच ‘चाळणीवाला’ आहे.”
वर्षानुवर्षे सुरू राहिलेल्या समाज मनातील दु:ख कवी खंडू रघुनाथ माळवे यांच्या कवितेमधून दिसते. लहानपणी वडिलांबरोबर गावोगावी हिंडताना त्यांनी मागासलेल्या समाजाची दु:खे पाहिली ती त्यांनी कवितांच्या माध्यमातून मांडली. कवी खंडू रघुनाथ माळवे यांचा हा चाळणीवाला हा कवितासंग्रह विश्वातील खरोखरच अनोखा ठरला असून त्यांच्या चाळणीवाला या आगळ्यावेगळ्या मराठी कवितासंग्रहाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये राज्य विक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. कवी खंडू रघुनाथ माळवे यांच्या नावावर नोंदवल्या गेलेल्या या विशेष राष्ट्रीय विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.