व्यापारी आघाडीच्या शहर उपाध्यक्षांची भाजपला सोडचिठ्ठी

गुड्डू अग्रवाल यांच्यासह 25 ते 30 व्यापाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

नागपूर : नागपूर भाजप व्यापारी आघाडीच्या शहर उपाध्यक्षांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. नागपूरचे काँग्रेस शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत गुड्डू अग्रवाल यांच्यासह 25 ते 30 व्यापाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये गेली अनेक वर्षे काम केलेले व्यापारी आघाडीचे शहर उपाध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या समर्थकांसह पक्षप्रवेश केला. भाजपची धोरणे व्यापाऱ्यांच्या हिताची नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या हितासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी गूड्डू अग्रवाल यांनी सांगितले.जपच्या धोरणांना व्यापारी कंटाळले आहेत. गेल्या काही वर्षांत भाजपमुळे व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे हे व्यापारी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, असे मत विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.याआधी, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिंदोरे यांच्यासह पूर्व नागपुरातील काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी हे कार्यकर्ते फोडल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र आता काँग्रेसमध्येही कार्यकर्त्यांचे बळ वाढताना दिसत आहे. दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून प्रा. बबनराव तायवाडे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला दोन वेळा टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. त्यामुळे आता तरुण दमाचे अभिजित वंजारी यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून यंदा विद्यमान आमदार अनिल सोले यांच्याऐवजी महापौर संदीप जोशी यांना संधी दिली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.