बसचालकास अचानक हृदयविकाराचा झटका, सिग्नलपोल तोडून बस दुकानात…

चेंबूर 'बसंत पार्क'जवळ सुदैवाने अपघात होता-होता टळला, प्रवासी बचावले बालंबाल

0

मुंबई  :  घाटकोपर स्टेशन पूर्वपासून बस नंबर 381 सकाळी 10.30 वाजता  निघाली होती. जेव्हा ही बस चेंबूरच्या टाटा पावर स्टेशनजवळ पोहोचली, तेव्हा अचानक बस चालकास हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याचा बसवरील तापा सुटला आणि बस एका भाजीच्या दुकानात घुसली.

ड्रायव्हरला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चेंबूर परिसरात बेस्टची बस दुर्घटनाग्रस्त झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 20 पेक्षा जास्त प्रवासी होते. बीएमसीकडून जारी केलेल्या जबाबात म्हटले आहे की, बस नंबर 381 सकाळी 10.30 वाजता घाटकोपर स्टेशन पूर्वपासून निघाली होती. जेव्हा ही बस चेंबूरच्या टाटा पावर स्टेशनजवळ पोहोचली, तेव्हा अचानक बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याचा बसवरील तापा सुटला आणि बस एका भाजीच्या दुकानात घुसली. हा अपघात मंगळवारी दुपारी चेंंबूर पोलिस स्टेशनसमोरील ‘बसंत पार्क’जवळ दुपारी 12 वाजेच्या जवळपास झाला. हरिदास पाटील नावाच्या बस ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे बेस्टची बस ट्रॅफिक सिग्नलला धडक देत एका दुकानात घुसली. यामध्ये बसच्या एका भागाचे  नुकसान झाले. हरिदास पाटीलचा घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.