मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडणार; बाजारपेठेतील भाजीपाल्याचे दर कडाडले

फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर जवळपास दुप्पटीने वाढले

0

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये होणारी भाजीपाल्याची आवक लक्षणीयरित्या घटली. परिणामी फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर जवळपास दुप्पटीने वाढले आहे.

राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये होणारी भाजीपाल्याची आवक  घटली. परिणामी फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर जवळपास दुप्पटीने वाढले. यामुळे आता सर्वसामान्यांचे घरातील बजेट कोलमडले आहे. सामान्य घरातील गृहिणी या वाढीव खर्चामुळे मासिक खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, या चितेंत दिसत आहे. घाऊक आणि किरकोळ दोन्ही बाजारपेठांमध्ये भाववाढ दिसत आहे. पालक, मेथी, कोथिंबीर हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि मटार दुप्पट भावाने विक्री केली जात आहे. भाज्यांसोबतच डाळींचे भावदेखील वाढले. लॉकडाऊन आणि कोरोनाचा संकट असताना भाज्यांचे आणि डाळींचे दर वाढल्याने विक्रेते आणि ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सध्या भाजीपाल्याने शंभरी पार केली. सगळ्याच भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले. अतिवृष्टीमुळे बहुतांश भाजीपाला शेतातच सडून गेला, रेल्वेसेवा बंद असल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी होते तर इंधनाच्या दरवाढीने वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम भाजीपाला महागण्यास कारणीभूत ठरला. तसेच बहुतांश धरणे भरल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला सोडून रब्बी हंगामाची कास धरली. त्यातून भाजीपाल्याचे क्षेत्र कमी झाल्याचा परिणाम बाजारात दिसून येतो. भाज्यांसोबत कांदे, बटाटे, लसूण , आले आणि अंडी याचेही भाव वाढले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.