राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे १५० चौरस फुटांच्या खादी कापडावर कोलाज

0

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे मुंबई मंडळाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. विविध कलाविष्कारांद्वारे बापूंचा सामाजिक संदेश लाखो प्रवाशांना रेल्वे प्रशासनामार्फत या कालाकृतींतून दिला.

यावर्षी कोरोना संकटामुळे दरवर्षी इतकी प्रवाशांची गर्दी नसली तरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बापूंचे गोधडी स्वरुपातील १५० चौ. फुटांचे पोर्ट्रेट आणि गांधीजींचे विचार दर्शविणारे 80 चौ.फुटांचे भव्य पोर्ट्रेट प्रवाशांना पाहायला मिळाली. या कलाकृतीचे विशेष हे की कुडाळ येथील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या जिव्हाळा सेवाश्रम या वृद्धाश्रमातील वृद्धांनी ही कलाकृती साकारली असून संकल्पना कलादिग्दर्शक डॉ. सुमीत पाटील यांची आहे. मंडळ सांस्कृतिक अकादमी, मुंबई मंडळ मध्य रेल्वे आणि श्रीरंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होणाऱ्या या कलाकृतीला  ‘ प्रोटेक्ट इंडिया  मुव्हमेंट ‘अंतर्गत गोदरेज  लिमिटेडने त्यांच्या  स्वछता विषयक आवश्यक प्रथाच्या प्रसाराकरिता, वैयक्तिक आणि गृह स्वच्छ्ता ब्राँड गोदरेज प्रोटेक्ट या सार्वजनिक मोहिमेद्वारे या संकल्पनेला प्रोत्साहन दिले आहे.
या पोर्ट्रेट द्वारे गांधीजींची विचारधारा आणि त्यांच्या वापरातील वस्तू आणि त्यामागील संदेश, तत्व आपल्याला दिसतील. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी स्वतंत्रता युद्धात, ऐनभरात असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे (त्यावेळचे व्हिक्टोरिया टर्मिनस) भेट दिली होती. त्यांच्या या ऐतिहासिक भेटीच्या आठवणी या कलाकृतीतून जाग्या केल्या गेल्या.
१५० चौरस फुटांच्या खादी कापडावर महात्मा गांधीजींची प्रतिमा आणि भारतीय रेल्वेचे चित्र गोधडी स्वरूपातील कोलाज हे यातील खास आकर्षण आहे. ‘सेवा हाच धर्म’ या गांधीजींच्या विचारधारणेला धरून ही संकल्पना साकारण्यात आली. कोरोना काळात मास्कची हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग झाला.  ‘मास्क’ जशी कोरोना संकटात आपली ढाल बनतो त्याचप्रमाणे गांधीजींनी सांगितलेली मूल्ये लोकशाही अधिक बळकट करण्यास मदत करतात. याच जाणिवेतून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी समाजाला विसर पडलेली गांधींची मूल्ये सत्य, समता, बंधुता, स्वातंत्र्य, एकता आणि प्रेम यांची कॅलिग्राफी मास्कवर साकारली. यात विविध रंगांच्या कपड्यांचा आणि धाग्यांचा वापर करण्यात आला आहे. ही कलाकृती साकारतानाचा एक व्हिडीओदेखील बनवण्यात आला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.