श्रीलंका क्रिकेटला मोठा धक्का, 18 शतके झळकावणाऱ्या ओपनरसोबत 15 खेळाडू देश सोडणार!

श्रीलंका क्रिकेट संघाच्या 15 खेळाडूंनी देश सोडून दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचा विचार

0

मुंबई :श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आणि श्रीलंका क्रिकेट जगताला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंका क्रिकेट संघाच्या जवळपास 15 खेळाडूंनी देश सोडून दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचा विचार केला आहे. यामुळे श्रीलंकेत एकच खळबळ उडाली आहे. आपला देश सोडून अमेरिकन क्रिकेटसाठी हे खेळाडू क्रिकेट खेळू शकतात, असे प्राथमिक अनुमान लावले जात आहे.

देश सोडून जाणाऱ्यांमध्ये श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज उपुल थरंगासोबत 15 खेळाडूंची नावे आहेत. पुढच्या महिन्यात हे 15 खेळाडू अमेरिकेत जाऊ शकतात. इव्हाना त्याची तयारीही सुरू झाली आहे. संघात योग्य संधी न मिळाल्याने तसेच कमी वेतनामुळे या खेळाडूंनी देश सोडून जाण्याचा विचार केला आहे.श्रीलंकेने वृत्तपत्र द मॉर्निंगच्या अनुसार, हे 15 क्रिकेटर्स आपल्या देशातील संघात योग्य न संधी न मिळाल्याने तसेच आर्थिक पातळीवर जास्त फायदा होत नसल्याने हे खेळाडू निराश होते तसेच ते नव्या पर्यायांच्या शोधात होते. पाठीमागच्या महिन्यात ऑलराऊंडर शेहान जयसूर्याने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतल्याने आता त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात बाकी खेळाडू आहेत.

उपुल थरंगासह 15 खेळाडू अमेरिकेला जाणार

रिपोर्टनुसार, श्रीलंकेचा धडाकेबाज ओपनर उपुल थरंगा, जलदगती गोलंदाज दुष्यंत चमीरा, अमिला अपोंसो, दिलशान मुनवीरा, लाहिरु मधुयशनका, मनोज सरतचंद्रा आणि निशान जेरीस यांसारख्या खेळाडूंनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहै. हे खेळाडू मार्चपर्यंत आपला देश सोडून अमेरिकेला रवाना होतील.

श्रीलंकेत चांगले भविष्य नाही

अमिरेकेला जाण्याचा निर्णय घेणाऱ्या एका खेळाडूने दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो, श्रीलंकेत चांगले भविष्य नाही. यासाठी आम्ही खेळाडूंनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय. घेतला आहे. जगातील विविध देशांच्या क्रिकेटपटूंना एकत्रित करुन जगाला चांगले क्रिकेट देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वेतन कमी केल्याने तसेच कॉन्ट्रॅक्ट न वाढवल्याने खेळाडू नाराज होते. आमच्या भविष्याची आम्हाला चिंता होती. त्याच चिंतेतून आम्ही पर्यायांचा विचार करत होता. अखेर आता आम्ही अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.