राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलने, नेतृत्व दोन्ही छत्रपतींनी करण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले महत्वाचे वक्तव्य

0

पंढरपूर : राज्यात मराठा आरक्षणावरुन आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व दोन्ही छत्रपतींनी करावे, अशी देखील मागणी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल महत्वाचं वक्तव्य केलेआहे. सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण प्रकरणात चर्चेत असलेले दोन्ही छत्रपती हे भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर आले आहेत. सध्या केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी त्यांच्याकडून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असा टोलाही खासदार छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांना शरद पवारांनी लगावला.

मराठा आरक्षणावरून आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व दोन्ही छत्रपतींनी करावे, अशी देखील मागणी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल महत्वाचं वक्तव्य केलेआहे. सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण प्रकरणात चर्चेत असलेले दोन्ही छत्रपती हे भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर आले आहेत. सध्या केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी त्यांच्याकडून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असा टोलाही खासदार छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांना शरद पवारांनी लगावला. मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक गट पडलेले दिसत आहेत. यामुळं या आंदोलनाचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असलेल्या संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी करावे, अशी मागणी पुढे येत आहे. याच संदर्भात बोलताना पंढरपूरमध्ये शरद पवार म्हणाले की, या दोघांनीच या लढ्याचे नेतृत्व करावे. हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा त्यांनी भाजपाकडून या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.