बुलडाण्यात संपत्तीच्या वादातून दत्तकपुत्राने केला बापाचा खून

वडिलांचा गळा आवळून खून, दत्तकपुत्रास अटक, खुनाची दिली कबुली

0

बुलडाणा : दत्तकपुत्र म्हणून स्वीकारलेला बाप शेतात हिस्सा देत नाही. पत्नीच्या दवाखान्यासाठी पैसे देत नाही. हा राग मनात ठेऊन सोपान दळभंजन या दत्तकपुत्राने वडील निवृत्ती दळभंजन यांना शेतात गळा आळून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सगोडा गावातील शेतकरी निवृत्ती पुंडलीक दळभंजन, (वय ४५) यांनी निवृत्ती दळभंजन यांनी सोपान दळभंजन या पुतण्याला मागील वर्षी दत्तक घेतले होते. सोपान दळभंजन याने ४ सप्टेंबर रोजी शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी सोपान यानं वडिलांना सर्पदंश झाल्याचे आणि त्यामुळे हार्टअटॅक आल्याचे सांगितले. डॉक्टरांनी यावेळी तपासणी केल्यानंतर निवृत्ती दळभंजन हे रुगणालयात दाखल होण्यापूर्वी मरण पावल्याचे सांगितले. यांनतर शवविच्छेदन झाल्यानंतर दळभंजन यांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. अकोला वैद्यकीय महाविद्यालयाने एका महिन्यानंतर दिलेल्या फॉरेन्सिक अहवालातून दळभंजन यांचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे समोर आले. या अहवालानंतर बुलडाणा जिल्ह्यातील सगोडा गावात खळबळ उडाली. अकोला वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक तज्ञांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालात मृत दळभंजन यांना दोरीच्या साहायाने ठार मारले असल्याचे उघडकीस आले. शेगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी दत्तकपुत्र सोपान दळभंजन याला अटक करत खुनाचा गुन्हा दाखल केला, अशी माहिती शेगाव ग्रामीणचे ठाणेदार संतोष ताले यांनी दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी दत्तकपुत्राला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, आपणच संपत्तीच्या वादातून बापाचा खून केल्याची कबुली दिली. सोपान दळभंजनने वडिलांना शेतात सर्पदंश झाला असून त्यामुळे हार्टअटॅक आला, असे भासवले होते. नातेवाईकांसह गावातील पोलिस पाटील, सरपंच यांना खोटी माहिती दिली होती. मात्र,फॉरेन्सिक अहवालानंतर त्याचा बनाव उघडकीस आला.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.