ठाकरे सरकारची घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर
मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचे जाहीर केल. तसेच राज्याचे केंद्राकडे 38 हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचे म्हटल आहे. दिवाळीपर्यंत ही मदत देऊ. सणासुदीत बळीराजाच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते. साधारणपणे ऑक्टोबर 2019 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 30 हजार 800 कोटी रुपये दिले. यात कर्जमुक्तीचाही समावेश आहे. ९ हजार ८०० कोटी विविध नैसर्गिक आपत्तींसाठी दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्याचे केंद्राकडून जवळपास ३८ हजार कोटी रुपये एकूण येणे बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळ – १ हजार ६५ कोटी रुपये बाकी, पूर्व विदर्भात पूर – ८०० कोटी रुपये बाकी आहेत. याचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पण पैसे आलेले नाहीत.ऑगस्टपासून अतिवृष्टी सुरू, पण केंद्राकडून पाहणीसाठी पथक आलेले नाही. राज्यात संकटांची मालिका सुरुच आहे. राज्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपये देण्याची राज्याची घोषणा केली आहे. पिकं, रस्ते, वीजेचे खांब, खरडून गेलेली जमीन, अशा सगळ्यांसाठी ही मदत आहे. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सध्या परिस्थिती कठीण, राज्याकडेही पैसा नाही. पण अशा स्थितीतही राज्य शेतकऱ्यांना मदत करत आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. केंद्राच्या नियमानुसार बागायती आणि कोरडवाहूसाठी ६ हजार ८०० रुपये दिले जाऊ शकतात. पण आम्ही हेक्टरी १० हजार रुपये मदत देणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तर फळबागांसाठी १८ हजार प्रति हेक्टर ही केंद्राच्या नियमानुसार, पण राज्य सरकार २५ हजार प्रति हेक्टर मदत करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. सरकारच्या आतापर्यंतच्या पाहणीत राज्यभरातील जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एसडीआरएफ’च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टरसाठी 6500 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पुरामुळे शेतजमीन खरवडून गेली होती. तसेच शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणेही पाण्यात वाहून गेली होती. पुराचे पाणी शिरल्याने विहीर गाळाने भरुन गेल्या होत्या. याशिवाय, पुराचे पाणी घरात शिरल्याने कापून ठेवलेली पिकंही भिजली होती. त्यामुळे अनेक भागांमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठीही वैरण शिल्लक राहिलेली नाही.