जवानांवर हल्ल्याच्या तयारीत दहशतवादी; भारतात घुसखोरीचा प्रयत्न

कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानची दहशतवाद्यांना मदत

0

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटातही पाकिस्तान सतत दहशतवाद्यांना मदत करत आहे. पाकिस्तान जम्मू आणि कश्मीरमध्ये अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न करतो आहे. लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याचा कट रचत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 10 दिवसात भारतात जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पाकिस्तान एलओसीच्या मार्गे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत.

सूत्रांचे माहितीनुसार, एलओसीच्या भागात लष्कर, हिज्बुल आणि अल-बद्रचे अनेक दहशतवादी जमले आहेत. दहशतवाद्यांनी लॉन्च पॅडदेखील बनवला आहे. लष्करचे 16 दहशतवादी पीओकेमधून भारतात घुसखोरीच्या तयारीत आहे. लश्कर आणि अल बद्र 11 दहशतवादी 2 वेगळ्या ग्रुप्समध्ये तंगधार सेक्टरच्या बाजूने भारतात घुसखोरी करू शकतात. लष्करचे 5 दहशतवादी दुसऱ्या ठिकाणाहून घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. गुरेज सेक्टरमधून 12 हिज्बुलच्या दहशतवाद्यांचा एक ग्रुप भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. लष्करच्या आणखी 20 दहशतवाद्यांचा एक गट तंगदारपासून भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात आहे. सूत्रांचा असा दावा आहे की, स्मगलिंग करणाऱ्या एका ग्रुपने तंगधार भागात रेकीदेखील केली आहे. पैसे आणि हत्यारांची कमी असलेल्या दहशतवाद्यांना आयएसआयने मदत केली. हत्यार आणि ड्रग्ससाठी वेगळा रस्ता शोधत असलेल्या तस्करांनी संरक्षण दलाच्या तैनातीबद्दल देखील रेकी केली आहे. आयएसआयच्या मदतीने लष्कर आणि जैशच्या 3 दहशतवादी संघटनांनी स्थानिक नावे ठेवली आहेत. टीआरएफ, टीएमआय आणि जगवा-ए-हिंदलादेखील पाकिस्तानने अॅक्टिव केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.