दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 ला हल्ला घडवण्याचा कट? यावर्षी ‘या’ हल्ल्याला बारा वर्ष पूर्ण

खबरदाारी : पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक

0

नवी दिल्ली : येत्या 26 नोव्हेंबर रोजी  दहशतवाद्यांचा भारतात मोठा घातपात घडवण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे काल (19 नोव्हेंबर) भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार अतिरेक्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (20 नोव्हेंबर) उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर यंत्रणाचे अधिकारी उपस्थित आहेत. मुंबईच्या 26/11 हल्ल्याला यावर्षी बारा वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, येत्या 26 नोव्हेंबरलाही अतिरेकी भारतात मोठा घातपात घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानंतर काल नागरोटा येथे भारतीय जवान आणि अतिरेकी आमनेसामने आले. नागरोटा येथे टोल नाक्याजवळ पोलिस आणि सैन्यदालाच्या जवानांनी एका ट्रकला थांबवले. या ट्रकमध्ये चार अतिरेकी लपून बसले होते. पोलिसांनी ट्रक थांबवताच अतिरेक्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी त्यांना बरोबर हेरले. त्यानंतर काल सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरू झाली. या चकमकीत चार अतिरेक्यांना ठार मारले. त्यांच्याजवळ मिळालेले 11 एके-47 रायफल, तीन पिस्तूल, 29 ग्रेनेड आणि इतर स्फोटक साहित्य पोलिसांनी जप्त केले.

मुंबई हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्याची मुंबईकरांना आजही आठवण आली तरी अंगावर शहारे येतात. लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेच्या 10 अतिरेक्यांनी संपूर्ण मुंबईत हाहा:कार माजवला होता. या हल्ल्यात 166 निरापराध लोकांचा बळी गेला होता. तर 300 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यावेळी अतिरेकी समुद्रमार्गे भारतात दाखल झाले होते. या अतिरेकी हल्ल्यात मुंबई पोलिस, एटीएस आणि एनएसजीचे 11 जवान शहीद झाले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.