मजूर घेऊन जाणारा टेम्पो उलटला, 18 जण जागीच ठार

0

पुणे-सातारा महामार्गावर खंडाळा घाटाच्या एस टर्नवर टेम्पो उलटला असून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 18 जण ठार झाले असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. आतापर्यंत एस टर्नवर या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत.

या टेम्पोमध्ये अनेक मजूर दाटीवाटीने बसलेले होते. हा टेम्पो साता-याहून पुण्याकडे जात होता, त्यावेळी टेम्पो चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो थेट दरीत कोसळला. तसेच टेम्पोमध्ये बांधकामाचे अवजड साहित्य भरलेले होते, मजदूरांना या साहित्याचा फटका बसला. मृतांमध्ये चालकाचाही सामावेश आहे. हा अपघात घडल्यानंतर मागून दुस-या वाहनाने येणा-या त्यांच्याच काही साथीदारांनी खंडाळा पोलिसांना याविषयी माहिती दिली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.