औरंगाबाद तालुका काँग्रेस समितीच्या वतीने करमाड येथे लाक्षणिक उपोषण

कृषी विषयक केलेल्या कायद्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होणार

0

करमाड :  केंद्र सरकारने कृषी विषयक केलेल्या कायद्यामुळे शेतकऱ्याची अतोनात नुकसान होणार आहे शेतमालाची आधारभूत किंमत एकूण खर्चाच्या ज्यामध्ये शेतमालाची वाहतूक सुद्धा समाविष्ट आहे त्याच्या दीडपट किमान आधारभूत किंमत असावी, अशी स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे मात्र येथे सरकार नव्या कायद्यात आधारभूत किमती बाबत विधेयकामध्ये कुठेही स्पष्टता नाही..! याकरिता औरंगाबाद तालुका काँग्रेस समितीच्या वतीने करमाड येथे दि.२ ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण करण्यता आले.

केंद्र सरकारने कृषी विषयक केलेल्या कायद्यामुळे शेतकऱ्याची अतोनात नुकसान होणार आहे. शेतमालाची आधारभूत किंमत एकूण खर्चाच्या ज्यामध्ये शेतमालाची वाहतूक सुद्धा समाविष्ट आहे त्याच्या दीडपट किमान आधारभूत किंमत असावी अशी स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे मात्र येथे सरकार नव्या कायद्यात आधारभूत किमती बाबत विधेयकामध्ये कुठेही स्पष्टता नाही..! शेतकऱ्याला आपला माल वाटेल त्या किमतीला येईल हे टाळ्याखाऊ वाक्य तेवढेच फसवे आहे, ही किंमत कोण ठरवणार, याबद्दल काही बोलायला सरकार तयार नाही. सुरुवातीला काळात थोडा तोटा सोसून खासगी कंपन्या प्रचंड भांडवल लावून शेतमालाची खरेदी करणार पर्यायाने बाजार समित्या बंद पडणार.. त्याचबरोबर इंडस्ट्रियल रिलेशन बिल 2020… हा कायदा लागू झाल्यानंतर कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अधिकार मिळणार आहेत. औद्योगिक संबंध सहिता 2020 मंजूर झाली आहे. त्यामुळे आता 300 पेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या कंपनीत कर्मचाऱ्यांची कपात करण्यास परवानगी दिली आहे या कायद्यामध्ये कामगारांच्या भल्याचा एक अवाक्षर सुद्धा काढले नाही. यामुळे कामगार देशोधडीस लागणार आहे. यासाठी पारित झालेले शेतकरी विरोधक विधेयक व कामगार विरोधक विधेयक आहे. केंद्र सरकारने पारित केलेले हे विधेयक तात्काळ रद्द करावे, याकरिता तालुका काँग्रेस कमिटी, तालुका युवक काँग्रेस कमिटी व तालुका सेवादल यांच्या नेतृत्वाखाली दोन ऑक्टेबरला  करमाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.  त्यावेळी उपस्थित जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ कल्याणराव काळे यांनी  सांगितले. यावेळी भीमराव डोंगरे, किरण पाटील डोणगावकर, जयप्रकाश नारनवरे, तालुका कांग्रेस अध्यक्ष रामराव शेळके, सेवादलचे तालुकाध्यक्ष कैलासराव उकर्डे, महिला कांग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष कविता शिंदे, युवक कांग्रेसचे विठ्ठलराव कोरडे, जहिर सेठ करमाडकर, सुरेश शिंदे, अर्जुन शेळके, मनोज भाऊ शेजुळ, संतोष शेजुळ, गजानन मते, नदिम शेख, गणेश पवार,राजू शेळके, बाबा पठाण,सुधाकर कचकुरे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.