साताऱ्यात 400 फूट खोल दरीत कोसळली स्विफ्ट कार, महिलेचा जागीच मृत्यू

साताऱ्यातील पाचगणी जवळच्या पसरणी घाटात आज सकाळी भीषण अपघात

0

सातारा : साताऱ्यामध्ये कार दरीत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली . साताऱ्यातील पाचगणी जवळच्या पसरणी घाटात आज सकाळी 11 च्या सुमारास हा भीषण  अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे पाचगणीवरून वाईकडे जाणारी स्विफ्ट कार 400 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

साताऱ्यामध्ये कार दरीत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली . साताऱ्यातील पाचगणी जवळच्या पसरणी घाटात आज सकाळी 11 च्या सुमारास हा भीषण  अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे पाचगणीवरून वाईकडे जाणारी स्विफ्ट कार 400 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती मिळताच, महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली असून या गाडीतील आणखी दोन जखमींना दरीतून बाहेर काढले असून तात्काळ उपचारासाठी वाईच्या मिशन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर अद्याप जखमींची ओळख पटली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जखमी हे मुंबई येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी गाडीला वर ओढण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.  दरम्यान, अपघात नेमका कसा झाला याचाही पोलिस शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. तर भीषण अपघात झाल्यानंतर महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच जखमींनाही मोठा धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.