विजयादशमीसाठी ‘सुवर्णनगरी’ सज्ज, ग्राहकांकडून सोने खरेदीस अल्प प्रतिसाद

सराफा बाजारात ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध आकर्षक योजना

0

जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीला सुवर्णनगरी जळगावातील सराफा बाजार सज्ज आहे. पण नागरिकांनी आज सोने खरेदीला अल्प प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. पण कोरोना आणि सोन्याचे वाढलेले भाव यामुळं नागरिकांनी सोनं खरेदीला ग्राहकांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे निदर्शनास येत आहे.

कोरोनामुळे गेली सात महिने सराफा बाजार बंद होता. सरकारने दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर दसरा हा पहिलाच मोठा सण आला आहे. त्यामुळे सराफा व्यावसायीकांनीही ग्राहकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तरीही सणवार आणि लग्नसराईत लोकांचा कल सोने खरेदीकडे राहिला आहे. पण आज सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. जळगावात आज सोन्याचा भाव ५१ हजार ६०० अधिक जीएसटी असा आहे. सराफा बाजारात ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध आकर्षक योजना देण्यात आल्या आहेत.  दसऱ्याच्या मुहूर्तावर सराफा व्यावसायिकांनी आपट्याची पानेही बनवली आहेत. ही पाने अर्धा ते दोन ग्रॅम वजनात उपलब्ध आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला होता. सरकारनं अनलॉक केल्यानंतर पहिलाच मोठा सण आला आहे. या सणावर थोडाफार कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. पण दिवाळीपर्यंत सर्व सुरळीत होईल, अशी अपेक्षा जळगावमधील सराफा व्यावसायिक सिद्धार्थ बाफना यांनी व्यक्त केली आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.