मुकुंदवाडीतील तरुणीचा संशयास्पद मृत्यू

शवविच्छेदन अहवालानंतरच हत्या, अपघात की आत्महत्या हे स्पष्ट

0

औरंगाबाद : मुकुंदवाडी येथील राजनगर भागातील कविता अमोल साठे वय-24 (रा.गेट क्र.56,राजनगर, मुकुंदवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या 24 वर्षीय तरुणीचा राहत्या घरी बेदम मारहाण झाल्याने मृत्यू झाला. ही घटना मुकुंदवाडी येथील राजनगर भागात घडली.
मुकुंदवाडी येथील राजनगर भागातील रहिवासी कविता अमोल साठे वय-24 (रा.गेट क्र.56,राजनगर, मुकुंदवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेबाबत अधिक माहिती की, बुधवारी 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास शहरातील एका खासगी रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत कविताला दाखल करण्यात आले होते. तेथे तिला राहत्या घरी मारहाण झाल्याची कारण नोंद करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने शासकीय घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना कवितांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेत कविताला मारहाण झाली नसून तिने गळफास घेतल्याचे सांगितले मात्र खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मारहाण झाल्याची नोंद उपचाराच्या कागदपत्रांवर लिहिली आहे. असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी दुपारी कवितांचा घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मात्र नातेवाईकांचे म्हणणे आणि वैद्यकीय नोंदीमध्ये तफावत येत असल्याने हे प्रकरण संशयास्पद आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच हत्या, अपघात की आत्महत्या हे स्पष्ट होईल. आज शुक्रवारी कविताच्या मृतदेहावर घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. दुपारपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे मृत्यूचे खरे कारण समोर आले नव्हते. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाला नंतर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती इंगळे यांनी दिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.