सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

याप्रकरणाचा तपास कोण करणार यावर न्यायालयाकडून निर्णय देणार

0

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार असून याप्रकरणाचा तपास कोण करणार यावर न्यायालयाकडून निर्णय देणार आहे. बिहार सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्ती विरोध करत आहेत. महाराष्ट्र सरकार मागणी करत आहे की, सीबीआच्या वतीने दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा. सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत मुंबई पोलिसांकडे सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी आतापर्यंत करण्यात आलेल्या सुनावणीचा अहवाल मागितला होता. तो पाहिल्यानंतर आणि सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी तपास कोण करणार, याचा निर्णय देणार आहे.
आज होणाऱ्या सुनावणीपूर्वी रिया चक्रवर्तीने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. रियाने सांगितले आहे की, पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआर कोणताही आधार नाही. हे एफआयआर मुंबईत ट्रान्सफर होऊ नये, म्हणूनच याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय असे करता येऊ शकत नाही. दरम्यान, रियाने हेदेखील सांगितले की, जर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या वतीने तपास सीबीआयकडे सोपवला, तर तिला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. रियाने सीबीआय आणि ईडीच्या काम करण्याच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिच्या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे की, ‘पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने सुशांतच्या बँक खात्यातून करण्यात आलेल्या देवाण-घेवाणीची चौकशी सुरू केली आहे. तसेच सीबीआयनेही लगेच गुन्हा दाखल केला आहे. इतरही अनेक मोठी प्रकरणे आहेत, ज्यांचा तपास या एजन्सी करत नाहीत. परंतु, या प्रकरणी वेगाने दोन्ही एजन्सी काम करत आहेत. प्रतिज्ञापत्रात संपूर्ण प्रकरणाच्या मीडिया ट्रायलबाबत सांगण्यात आले आहे. असे सांगण्यात आले आहे की, ‘मीडियाने रियाला आधीपासूनच दोषी ठरवले आहे.

याआधी 2जी आणि आरुषि तलवार केसमध्ये ज्या लोकांना मीडियाने आपल्याकडून दोषी ठरवले होते. ते सर्वजण निर्दोष सुटले. सुशांतनंतरही अनेक अभिनेत्यांनी आत्महत्या केली आहे. परंतु, मीडियाचा रस याच प्रकरणात जास्त आहे. हे प्रकरण सर्वांसमोर वेगळ्या रंगात मांडले जात आहे. रिया आधीपासूनच हैराण आहे. अशातच तिच्या वैयक्तिक जीवनाचा तमाशा मांडण्यात आला आहे. रियाने आपली राजकारणात गुरफटून शिकार झाल्याचे सांगितले. ती म्हणाली की, याप्रकरणी एवढ्या गोष्टी घडण्याचे एक कारण बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूकाही आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी स्वतः याप्रकरणी रस दाखवला. त्यानंतर पाटणा पोलिसांनी सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल केला. कायद्याने असे करण्याचा पाटणा पोलिसांना कोणताही हक्क नाही. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी सर्वात आधी रिया चक्रवर्ती पोहोचली होती. तिने पाटणात दाखल केलेला एफआयआर मुंबईत ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बिहार सरकारच्या शिफारसीने दाखल करण्यात आलेला एफआयआर सीबीआयकडे सोपविण्यात आला. महाराष्ट्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात सीबीआयकडे अशाप्रकारे प्रकरण सोपवणे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यांची मागणी आहे की, सीबीआयच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला मुंबई वांद्रे पोलिस ठाण्यात ट्रान्सफर करण्यात यावे. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.