आश्चर्यच!! काम चोरी करणे, महिन्याला पगार, मालक बिहारमध्ये, चोर नागपुरात

आंतरराज्यीय मोबाईल चोरांची पकडली टोळी, त्यांच्याकडून जो खुलासा आश्चर्यकारक

0

नागपूर : चोरसुद्धा पगारी असतात हे ऐकून आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे, मात्र हे खरे आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी मोबाईल चोरांची आंतरराज्यीय टोळी पकडली असून त्यांच्याकडून जो खुलासा झाला आहे तो ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. या टोळीतील सर्व चोर पगारी आहेत. या टोळीचा प्रमुख बिहारमधून टोळी सांभाळतो आणि प्रत्येकाला त्याच्या कामानुसार पगार देतो.

नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी मोबाईल चोरांची टोळी पकडली आहे. त्यात एकूण चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत बिहार आणि झारखंडमधील चोरांचा समावेश आहे. हे चोर नागपुरात वेगवेगळ्या बाजारांच्या ठिकाणी मोबाईल आणि पर्स चोरतात त्यासाठी अल्पवयीन मुलांची मदत घेतात. हे चोर वेगवेगळ्या बाजारात काही दिवस चोरी करतात आणि मग आपल्या राज्यात निघून जातात. त्यांचे राहण्याचं ठिकाण नसल्याने त्यांना शोधणे कठीण होते. मात्र नागपूर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर चोरांनी जे काही सांगितले ते ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. हे चोर चोरी करायचे मात्र ती त्यांची नोकरी होती, चोरी करण्याचा त्यांना पगार दिला जात होता. जो जास्त चोरी करेल त्याला त्याच्या कामासाठी पगाराव्यतिरिक्त कमिशनसुद्धा मिळते. प्रत्येकाला 10 ते 15 हजार रुपये पगार दिला जातो. त्यांना पगार देणारा म्होरक्या बिहारमधून टोळी सांभाळतो. पोलिसांनी या चोरांकडूंन वेगवेगळ्या ठिकाणी चोरलेले 5 महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.