4 आठवड्यांत 453 कोटी रुपये जमा करा, नाहीतर तुरुंगात जा, अंबानींना कोर्टाचा मोठा झटका

0

सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि दोन संचालकांना अवमान प्रकरणात दोषी ठरवले आहे. अनिल अंबानींच्या कंपनीचे एरिक्सनचे 550 कोटी रुपये अद्याप परत केले नाही. एरिक्सन इंडियाने 550 कोटी रुपये रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडकडे बाकी असल्याचे याचिकेत म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करून एरिक्सन इंडियाच्या बाजूने निर्णय दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने अनिल अंबानी आणि रिलायन्सच्या दोन संचालकांना खडेबोल सुनावले आहेत. एरिक्सन कंपनीच्या थकबाकीपैकी 453 कोटी चार आठवड्यांच्या आत भरण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. निर्धारित वेळेत पैसे परत न केल्यास प्रत्येकी तीन महिन्यांचा तुरुंगवासही होऊ शकतो. आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने तिघांना प्रत्येकी एक एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जर एक महिन्यात दंडाची रक्कम जमा न केल्यास एक महिन्याचा शिक्षा भोगावी लागते.

एरिक्सन कंपनीने अनिल अंबानीसह कंपनीचे संचालक सतीश सेठ, रिलायन्स इन्फ्राटेलचे अध्यक्ष छाया विरानी आणि एसबीआयचे अध्यक्षांविरोधात न्यायलयात तीन अवमानता याचिका दाखल केल्या होत्या. त्यापूर्वी न्यायमुर्ती आर.एफ. नरिमन आणि न्यायमुर्ती विनीत सरन यांच्या खंडपीठाने 13 फेब्रुवारीला सुनावणी केली होती, मात्र त्यांनी निर्णय राखून ठेवला होता.

स्वीडनची इलेक्ट्रॉनिक्स उपकरण कंपनी एरिक्सनने आपली भरपाई वसूल करण्यासाठी अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनी विरोधात सुप्रीत कोर्टात याचिका दाखल केली आहे. एरिक्सन इंडियाने केलेले आरोप, रिलायन्स समुहाकडे राफेल करारासाठी पैसे आहेत, परंतु आमचे 550 कोटी रुपये परत करण्यासाठी पैसे नाहीत. मात्र अनिल अंबानी यांनी आपल्यावर लावलेले आरोप फेटाळले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.