आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी

राज्याचे मराठा आरक्षण सुनावणीकडे लक्ष

0

नवी दिल्ली : आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती  दिल्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर  स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या खंडपीठात यावर सुनावणी होणार आहे .

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती  दिल्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर  स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.  न्यायमूर्ती एल.एन.राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारकडून वकील मुकुल रोहतगी, अभिषेक मनु सिंगवी, कपिल सिब्बल बाजू मांडतील. तर विनोद पाटील यांच्या वतिने वकील संदीप देशमुख बाजू मांडतील. तर राज्य  सरकारकडून वकील पी एस पटवलीया बाजू मांडणार आहेत. विनोद पाटील यांच्या महाराष्ट्र सरकारकडे मागणीनुसार महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करावी, अशी विनंती केली आहे. आजच्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारने एल.एन. राव यांच्या खंडपीठाने सुनावणी न करण्याची विनंती याचिका दिली आहे. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल दिला. घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे, असा निर्णय न्यायालयाने सुनावला होता. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार आहे. स्थगिती उठवण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा समाजाचं या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.