सुप्रिटेंड यादव चौव्हान यांची नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील शिशु केअरची पाहणी
राज्य सरकारचे महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ऑडिटचे आदेश
नांदेड : भंडारा येथील सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे शिशु केअर युनिट ला आग लागून 10 नवजात शिशुंचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेनंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहे.
भंडारा येथील सामान्य रुग्णालयात शिशु केअर युनिट ला आग लागून 10 नवजात शिशुचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेनंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. राज्य सरकारने सर्व शासकीय रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शंकरराव चौव्हान शासकीय रुग्णालय सर्व अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करणात आल्या आहेत. सध्या स्थितीत रुग्णालयात शिशु केअर युनिट मध्ये 34 बेड असून त्यामध्ये एनआयसीयू आणि आयसीयू, अशा प्रकारची विभागणीअसून सद्यस्थितीत आपत्कालीन परिस्थिती किंवा इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्यास एक इंजिनीअर व त्यासोबत अन्य कर्मचारी पाहणी गरज पडल्यास करत असतात. यावेळी आगीची अथवा काही दुर्घटना घडल्यास फायर ब्रिगेड सेफ्टीची व्यवस्था आहे. या सर्व घडामोडींवर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता व सुप्रिडेंट व मुख्य व्यवस्था विभाग प्रमुख वेळोवेळी भेटी देत पाहणी करून दुरुस्त केल्या जातात. भंडारा येथील घटनेनंतर शासकीय रुग्णालयाचे सुप्रिडेंड यादव चौव्हन यांनी यावेळी शिशु केअर ची पाहणी शिशु केअर व इतर डिपार्टमेंटची यांनी पाहणी केली. यानंतर सर्व काही व्यवस्थित असल्याचे मत यादव चौव्हन यांनी मिडियासमोर मांडले.