प्रसिद्ध कीर्तनकार मच्छिंद्र महाराज यांच्या पत्नी सुलोचनाबाई गोधे यांचे निधन
सुलोचनाबाई मच्छिंद्र गोधे ( वय ६५) यांचे दीर्घआजाराने निधन
करमाड : कोळी शिरसगाव (ता.अंबड) येथील रहिवासी सुलोचनाबाई मच्छिंद्र गोधे ( वय ६५) यांचे दीर्घआजाराने बुधवार( ता.२५) रोजी निधन झाले.
कोळी शिरसगाव (ता.अंबड) येथील रहिवासी सुलोचनाबाई मच्छिंद्र गोधे ( वय ६५) यांचे दीर्घआजाराने बुधवार( ता.२५) रोजी सकाळी ६ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सुना, नातवंडे असा परिवार होत. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसिद्ध कीर्तनकार मच्छिंद्र महाराज गोधे यांच्या पत्नी तर महावितरण कर्मचारी गजानन गोधे यांच्या मातोश्री होत.