सुजय विखे हे भाजपचे खासदार, मंत्रालयात काय शिजते हे त्यांनी सांगावे!

प्राजक्त तनपुरे यांनी सुजय विखेंवर केली टीका

0

अहमदनगर : सुजय विखे हे भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे मंत्रालयात काय शिजते हे त्यांनी स्पष्ट करावे, असा टोला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लगावला. अहमदनगरमधील लष्कराच्या के. के. रेंज विस्तारीकरणावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे. त्यावरूनच प्राजक्त तनपुरे यांनी सुजय विखेंवर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमधील लष्कराच्या के. के. रेंज विस्तारीकरणावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अहमदनगरमधील के. के. रेंज विस्तारीकरण होणार नसल्याचे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सांगितले आहे. त्यामुळे के. के. रेंज विस्तारीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खरे बोलतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीपूर्वी कळेल, असे वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केले होते. त्यामुळे के. के रेंजच्या विस्तारीकरणावरुन संभ्रम निर्माण झाला होता. यावर तनपुरे यांनी विखेंना सडेतोड उत्तर दिले आहे.

“के के रेंज संदर्भात विस्तारीकरण होणार की नाही हे निवडणुकीआधी कळेल. त्यामुळे पवार साहेबांवर विश्वास ठेवायचा का मोदी साहेबांवर? याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे”, असं भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केले होते. त्यामुळे स्थानिकांच्या मनात संभ्रम वाढला होता. के के रेंज विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण होणार की नाही? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. “राज्यात लोकनियुक्त सरकार नाही तर षडयंत्र सरकार आहे. या षडयंत्र सरकारकडून सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस मिळतील, असं मला वाटत नाही”, असा घणाघात सुजय विखे पाटील यांनी त्यावेळी केला होता. “राज्य सरकारमुळे भ्रमनिरास झाला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आले आहे. त्यांच्या या वर्षाच्या कामकाजाकडे पाहिले तर कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही. फक्त पत्रकार परिषदा, प्रवेश प्रक्रिया, घोषणाबाजी, नारळ फोडणे, फोटो काढणे एवढेच या सरकारचे काम आहे”, असा टोला सुजय विखेंनी लगावला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.