मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुगाव ग्रामपंचायतीचा मतदानावर बहिष्कार
सर्व निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. असे जिल्हाधिकारी यांना निवेदन
नांदेड : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारवर मराठा समाजाचा रोष व्यक्त होत असून आता विविध प्रकारच्या आंदोलनासह मतदानावर बहिष्कार टाकणे सुरू आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारवर मराठा समाजाचा रोष व्यक्त होत असून आता विविध प्रकारच्या आंदोलनासह मतदानावर बहिष्कार टाकणे सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील सुगाव बु.येथील मराठा समाजाने ग्रामपंचायत निवडणूकीसह येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. मराठा समाजाला शासनाने दिलेल्या एसईबीसी आरक्षणानुसार अनेक मुलांना नौकरीचे कॉल आले आहेत, पण सर्वोोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे सामावून घेतले जात नाही. मुलांची मनस्थिती बिघडत आहे तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्या शेकडो मराठा समाजाला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तरी अद्याप आम्हाला आरक्षण देण्यात आले नाही. उलट सर्व पक्षीयांकडुन राजकारणच केले जात असल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे.